13/11/2025
ल्यूथर यांच्या दृष्टीने, ख्रिस्ती जीवन हे सुवार्तेवर आधारित, सुवार्तेने बांधलेले आणि सुवार्तेचा गौरव करणारे असे जीवन आहे. हे जीवन देवाच्या मुक्त आणि सार्वभौम कृपेचे दर्शन घडवते आणि ज्या तारणकर्त्याने आपल्यासाठी प्राणार्पण केले त्याच्याप्रती आभारप्रदर्शन म्हणून जगले जाते. हे जीवन मरणाने विजयात गिळले जाईपर्यंत आणि विश्वास हा प्रत्यक्ष दर्शनात परिवर्तित होईपर्यंत ख्रिस्ताशी जखडून क्रूस वाहत जगले जाते.








