आमचे मार्गदर्शक तत्त्व:
सत्याचे पावित्र्य


आमच्या सेवाकार्याला मार्गदर्शन करणारे प्रमुख तत्त्व म्हणजे सत्याची पवित्रता. जरी आम्ही लोकांना समजावण्याचा, प्रोत्साहन देण्याचा आणि आग्रह करण्याचा प्रयत्न करत असलो, तरीही आम्ही कोणत्याही प्रकारच्या भावनिक ताणतणाव अथवा चुकीच्या दोषारोपणाद्वारे, लाभांची अतिशयोक्ती करून किंवा सेवाकार्याच्या गरजांचे मोठेपण करून लोकांवर प्रभाव टाकण्याचे तंत्र टाळतो. म्हणूनच, आम्ही खालील मानकांशी बांधील राहतो:

  • आम्ही आर्थिक अडचण असली तरीही “संकटाचे भांडवल ” करणार नाही.
  • आम्ही कोणावरही देणग्यांसाठी किंवा खरेदीसाठी दबाव टाकणार नाही.
  • आम्ही “आकर्षण दाखवून फसवणे” या पद्धतींचा वापर करणार नाही.
  • आम्ही उत्पादनांच्या किंमतीवर खोटे सवलत दर दाखवणार नाही.
  • आम्ही अशा लाभांचे आश्वासन देणार नाही जे आम्ही प्रत्यक्षात निश्चित देऊ शकत नाही.
  • सदोष उत्पादने बाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर वाद घालणार नाही.
  • आम्ही आमच्या स्वतःच्या गरजांपेक्षा विद्यार्थ्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करू.
  • सर्व विद्यार्थ्यांशी आम्ही नम्र आणि सौजन्यपूर्ण वागणूक ठेवू.
  • ऑर्डर आणि देणग्यांना वेळेत प्रतिसाद देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
  • नियुक्त निधी त्याच्या ठरवलेल्या हेतूनुसारच वापरला जाईल.
  • एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी उभारलेला निधी त्या प्रकल्पासाठीच वापरला जाईल.

प्रभूला हिशोब द्यावा लागणारे कारभारी म्हणून, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांमध्ये या आचरणाच्या तत्त्वांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो.

सेवेची वृत्ती

  • आमच्या हितचिंतकांच्या अपेक्षा समजून घेणे आणि त्याहून अधिक सेवा देणे.
  • संपूर्ण जगभरातील लोकांचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून बायबलाधिष्ठित व ख्रिस्ती शिक्षणाशी सुसंगत साहित्य व सेवा विकसित करणे.
  • देवाच्या वचनाने मार्गदर्शित व्यावसायिक नेतृत्व आणि वैयक्तिक विकास प्रदान करणे.

प्रामाणिकतेसाठी आवेश

  • सर्व नियमांचे व मानकांचे पालन करणे.
  • सेवा व निर्मितीच्या प्रत्येक घटकाचे सातत्याने विश्लेषण करून आणि सुधारणा करून उत्कृष्टतेचा पाठपुरावा करणे.
  • पारदर्शकता, निष्ठा आणि विश्वासार्हतेच्या आधारे परस्पर हिताचे संबंध वाढवणे.

विश्वासूपणाचा वारसा

  • संस्थेला बायबलची  अचूकता आणि सुसंगत धर्मसिद्धांत (सैद्धांतिक रूढीवाद) यांना समर्पित करणे.
  • डॉ. स्प्रौल यांच्या आयुष्यभराच्या सेवेशी सुसंगत उत्पादने तयार करणे व सेवाकार्य पुरविणे.
  • संसाधनांचे शिस्तबद्ध आणि सुयोग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणे.