शिक्षण-सहकारी

लिगोनियर सेवाकार्यासाठी या शिक्षक सहकाऱ्यांनी त्यांच्या अद्वितीय कौशल्यांचा, विस्तृत अनुभवाचा आणि उपयुक्त दृष्टिकोनाचा भर घातला आहे. ते संस्थेच्या मूळ उद्दिष्टाशी निष्ठावान राहण्यासाठी तसेच भविष्यातील प्रचारकार्य स्पष्टपणे मांडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. डॉ. आर. सी. स्प्रौल आणि संचालक मंडळाने, वर्तमान व भावी सेवेसाठी या विश्वासार्ह शिक्षकांची निवड व मार्गदर्शन केले आहे. "जे तू माझ्याकडून अनेक साक्षीदारांसमोर ऐकले आहेस, ते तू विश्वासू लोकांच्या स्वाधीन कर, जे दुसऱ्यांना शिकवण्यासही समर्थ असतील." (2 तीमथ्य 2:2) या अभ्यासू आणि अर्पित शिक्षकांसाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानतो.
डॉ. सिंक्लेयर बी. फर्ग्युसन

डॉ. सिंक्लेयर बी. फर्ग्युसन हे लिगोनियर मिनिस्ट्रीजचे सहकारी शिक्षक आहेत आणि रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये सिस्टेमॅटिक थिओलॉजीचे चान्सलर प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी कोलंबिया, दक्षिण कॅरोलिना येथील फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये वरिष्ठ पाळक म्हणून सेवा केली आहे. त्यांनी द व्होल ख्राइस्ट, द होली स्पिरिट, इन ख्राइस्ट अलोन, आणि डिव्होटेड टू गॉड यांसारख्या दोन डझनहून अधिक ख्रिस्ती ग्रंथांचे लेखन केले आहे, जे ख्रिस्तकेंद्री आणि बायबलनिष्ठ जीवनासाठी मार्गदर्शन करतात.
डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्री

डॉ. डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्री हे लिगोनियर मिनिस्ट्रीजचे सहकारी शिक्षक आहेत, तसेच वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्नियाचे अध्यक्ष एमेरिटस आणि चर्च इतिहासाचे प्राध्यापक एमेरिटस म्हणून ओळखले जातात. ते लिगोनियरच्या सहा भागांच्या शिक्षणमालिकेतील सर्वे ऑफ चर्च हिस्टरीचे मुख्य शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये गॉड्स पॅटर्न फॉर क्रिएशन, रिफॉर्मेशन स्केचेस, अनएक्स्पेक्टेड जर्नी, आणि लर्निंग टू लव्ह द साल्म्स यांचा समावेश होतो.
डॉ. स्टीफन जे. निकोल्स

डॉ. स्टीफन जे. निकोल्स हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच ते लिगोनियर मिनिस्ट्रीजचे मुख्य शैक्षणिक अधिकारी आणि सहकारी शिक्षक म्हणूनही सेवा बजावत आहेत. ते फाईव्ह मिनिट्स इन चर्च हिस्टरी आणि ओपन बुक हे दोन पॉडकास्ट्स सादर करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये फॉर अस अँड फॉर अवर साल्वेशन, जोनाथन एडवर्ड्स : अ गाईड टूर ऑफ हिज लाईफ अँड थॉट, पीस, आणि अ टाइम फॉर कॉन्फिडन्स यांचा समावेश होतो. ते द लेगसी ऑफ ल्यूथर आणि थिओलॉजियन्स ऑन द ख्रिस्चन लाईफ (क्रॉसवे पब्लिकेशन्स) या ग्रंथमालांचे सहसंपादक आहेत. ते ट्विटर या सामाजिक माध्यमावर @DrSteveNichols या नावाने सक्रिय आहेत.
बर्क पार्सन्स

डॉ. बर्क पार्सन्स हे सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील सेंट अँड्रू चॅपेल या मंडळीचे वरिष्ठ पाळक आहेत. तसेच ते लिगोनियर मिनिस्ट्रीजचे मुख्य प्रकाशन अधिकारी, टेबलटॉक मासिकाचे संपादक आणि सहकारी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते प्रेस्बिटेरियन चर्च इन अमेरिका या संप्रदायात नियुक्त सेवक आहेत आणि चर्च प्लॅंटिंग फेलोशिप या संस्थेचे संचालकही आहेत. ते व्हाय डू वी हॅव क्रीड्स? या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी अशुअर्ड बाय गॉड आणि जॉन कॅल्विन: अ हार्ट फॉर डिव्होशन, डॉक्ट्रीन अँड डॉक्सॉलॉजी या पुस्तकांचे संपादन केले आहे, तसेच जॉन कॅल्विन यांचे अ लिटल बुक ऑन द ख्रिश्चन लाईफ या पुस्तकाचे सह-अनुवादक आणि सह-संपादक आहेत. ते ट्विटरवर @BurkParsons या नावाने सक्रिय आहेत.
डेरेक डब्ल्यू. एच. थॉमस

डॉ. डेरेक डब्ल्यू. एच. थॉमस हे फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्च, कोलंबिया, साउथ कॅरोलिना येथील वरिष्ठ पाळक आहेत. ते रिफॉर्म्ड थिऑलॉजिकल सेमिनरी येथे सिस्टेमॅटिक अँड पास्टरल थिऑलॉजी या विषयाचे चान्सलर प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. ते लिगोनियर मिनिस्ट्रीज या संस्थेचे सहकारी शिक्षक (टीचिंग फेलो) आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये हाउ द गॉस्पेल ब्रिंग्स अस ऑल द वे होम, कॅल्विन्स टीचिंग ऑन जॉब, आणि डॉ. सिंक्लेअर बी. फर्ग्युसन यांच्यासह लिहिलेले इक्तूस: जीझस क्राइस्ट, गॉड्स सन, द सेव्हियर यांचा समावेश होतो.
