
आमचे ध्येय:
लोकांना देवाचे
आणि त्याच्या
पवित्रतेचे ज्ञान
वाढविण्यास मदत करणे
लिगोनियर मिनिस्ट्रीज ही एक आंतरराष्ट्रीय ख्रिस्ती संस्था आहे, जी प्रख्यात धर्मशास्त्रज्ञ डॉ. आर. सी. स्प्रौल यांनी 1971 साली स्थापन केली. आपला विश्वास काय, त्या विश्वासामागील कारण काय, त्यानुसार जीवनाचारण कसे असावे आणि तो विश्वास इतरांपर्यंत कसा पोहोचवावा या सर्व गोष्टींमध्ये विश्वासणाऱ्यांना प्रशिक्षित करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देवाच्या पवित्रतेची घोषणा हे आमच्या सेवेचा केंद्रबिंदू आहे. आमचे ध्येय, आवड आणि उद्देश म्हणजे लोकांना देव व त्याच्या पवित्रतेविषयीच्या ज्ञानात वाढण्यासाठी मदत करणे.
देव आपल्या लोकांना त्यांच्या मनाचे नूतनीकरण होऊन रूपांतरित होण्यास बोलावतो (रोम. 12:2). संस्कृती, तत्त्वज्ञान, ख्रिस्ती सिद्धांतसंरक्षण, नीतिशास्त्र आणि चर्च इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बायबलामध्ये प्रकट झालेल्या देवाच्या गौरवाची घोषणा करतो.
आमच्या वेबसाइटवर, वर्ग, अभ्यास मार्गदर्शिका आणि मल्टिमीडिया साधनसंपत्ती यांसारखी अनेक संसाधने उपलब्ध आहेत, ज्यांचा उपयोग आपण देवाच्या पवित्रतेची शिकवण देण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी, आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करू शकता.
