What Is the Wrath of God?

देवाचा क्रोध काय आहे?

19/05/2026
What Is the Wrath of God?

देवाचा क्रोध काय आहे?

19/05/2026

गर्भपाताच्या अपराध-भावनेतून मुक्तता

Resolving Abortions Guilt

हजारो लोक गर्भपाताशी निगडित अपराध-भावनेशी झुंज देत असतात. ज्यांनी गर्भपात केला आहे अशा स्त्रियांना, ज्यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले आहे अशा पुरुषांना, आणि ज्यांनी तो करून दिला आहे अशा डॉक्टरांनाही ही भावना सतत पछाडत राहते. न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तानुसार, एका डॉक्टरांनी सांगितले की गर्भपात करण्यापूर्वी त्यांना स्वतःला भावनिकरीत्या तयार करावे लागे, आणि अनेकदा निद्रानाश सहन करावा लागत असे. त्या म्हणाल्या, “स्त्रीरोगतज्ज्ञासाठी हे करणे फार कठीण असते. त्यातून उठणाऱ्या भावना इतक्या तीव्र असतात की… डॉक्टर याविषयी परस्परांशी बोलतही नाहीत.” एका प्रसंगी तर, गर्भपात केल्यानंतर त्या भावनेने व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळल्या.

अपराधीपणाची भावना ही एक शक्तिशाली भावना आहे, जिच्यात माणसाला मानसिकदृष्ट्या जखडून टाकण्याची, जणू काही अर्धांगवायूसारखी, क्षमता असते. एकदा माझी भेट एका कार्यरत मानसोपचारतज्ज्ञांशी झाली; त्यांनी मला त्यांच्या कर्मचारीवर्गात सामील होण्याची संधी देऊ केली. त्यांनी सांगितले की त्यांचे बरेच रुग्ण तीव्र अपराधीपणाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत. ते म्हणाले, “या लोकांना डॉक्टरची नाही, तर याजकाची गरज आहे. त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे की त्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे.”

या मानसोपचारतज्ज्ञांचा ख्रिस्ती धर्मावर कुठलाही भाव नव्हता, की कोणती निष्ठाही नव्हती; त्यांना फक्त त्यांच्या रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजी होती. न सुटलेल्या अपराधीपणाची विनाशकारी शक्ती त्यांनी ओळखली होती, आणि खऱ्या अपराधीपणाला सामोरे जाण्यासाठी नकार आणि तर्कशुद्ध समर्थन हे प्रभावी उपाय नाहीत, हेही त्यांना उमगले होते. खऱ्या अपराधीपणावर खरा उपाय एकच आहे, तो म्हणजे खरी क्षमा. आपल्या हातांवरील डाग फक्त झाकून टाकण्याचा प्रयत्न करणे, तो डाग खरोखरच दूर करून टाकला जाण्याच्या तोडीचा पर्याय कधीच ठरत नाही. 

देवाच्या क्षमेचा साक्षात्कार

अपराध क्षमेची गाढ मुक्तता अनुभवायची असेल, तर मनुष्याने केवळ देवाकडे जावे, आणि नम्र अंतःकरणाने व पश्चात्तापी आत्म्याने आपले पाप कबुल करावे. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याबद्दलचा खरा आणि देवाभिमुख शोक हा पश्चात्तापात समाविष्ट असतो. हा शोक शिक्षेच्या भीतीपोटी निर्माण होणाऱ्या खोट्या पश्चात्तापापेक्षा वेगळा आहे. भीतीपोटी निर्माण होणाऱ्या अशा पश्चात्तापाचे उदाहरण अशा मुलामध्ये दिसते जो आईच्या हातात छडी पाहिल्यावर, आपण कुकीच्या बरणीत हात घालताना पकडले गेलो याबद्दल दिलगीर असतो. खरा पश्चात्ताप अपराधीपणाचे वास्तव मान्य करतो आणि त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत नाही. जो कोणी खरी नम्रता, पश्चात्ताप, आणि पुन्हा तेच पाप न करण्याचा प्रामाणिक निर्धार घेऊन देवाकडे येतो, त्याला देवाची क्षमा नक्कीच मिळते.  

मी जे केले आहे ते पूर्ववत करता येत नसले, तरी मला क्षमा होऊ शकते. क्षमा ही देवाच्या कृपेचे एक आश्चर्यकर्म आहे. तिची आरोग्यदायी शक्ती थोर आहे. एखादी स्त्री गर्भपातात गुंतलेली असेल, तर तिने उरलेले आयुष्य आपल्या छातीवर लाल “A” लावून फिरावे, अशी देवाची अपेक्षा नाही. त्याची अपेक्षा एवढीच आहे की तिने आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप करावा, आणि क्षमेच्या शुद्धीकरणासाठी त्याच्याकडे यावे. देव जेव्हा आपल्याला क्षमा करतो, तेव्हा आपल्याला खरोखर क्षमा झालीच असे समजावे. देव जेव्हा आपल्याला शुद्ध करतो, तेव्हा आपण खरोखर शुद्ध होतो. हे मोठ्या आनंदोत्सवाचे कारण आहे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल

आर. सी. स्प्रौल

डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.