06/11/2025
शतकानुशतके, गोंधळ किंवा संकटाच्या काळात मंडळीने नेहमीच आपला विश्वास कबूल केला आहे. पवित्र शास्त्राची जागा घेणे ही धर्मसिद्धांत किंवा विश्वासाच्या कबूलनाम्यांची भूमिका कधीच नव्हती; उलट, चुकीच्या शिकवणीच्या विरोधात पवित्र शास्त्रातील सत्याविषयी मंडळीची साक्ष संक्षेपाने मांडणे हीच त्यांची भूमिका असायची (आणि आजही आहे).
