13/11/2025

ख्रिस्ती जीवनासाठी ल्यूथर यांच्याकडून प्रबोधन

ल्यूथर यांच्या दृष्टीने, ख्रिस्ती जीवन हे सुवार्तेवर आधारित, सुवार्तेने बांधलेले आणि सुवार्तेचा गौरव करणारे असे जीवन आहे. हे जीवन देवाच्या मुक्त आणि सार्वभौम कृपेचे दर्शन घडवते आणि ज्या तारणकर्त्याने आपल्यासाठी प्राणार्पण केले त्याच्याप्रती आभारप्रदर्शन म्हणून जगले जाते. हे जीवन मरणाने विजयात गिळले जाईपर्यंत आणि विश्वास हा प्रत्यक्ष दर्शनात परिवर्तित होईपर्यंत ख्रिस्ताशी जखडून क्रूस वाहत जगले जाते.
28/10/2025

प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित सर्वात खोटा सिद्धांत कोणता आहे?

ख्रिस्त एकदाच सर्वकाळाकरिता आमच्या पापांसाठी अर्पण झाला आहे; “अविनाशी जीवनाच्या सामर्थ्याने आमचा प्रतिनिधी याजक म्हणून तो उठविला गेला व निर्दोष ठरविला गेला. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण देवाच्या सिंहासनासमोर त्याच्या नीतिमत्वामुळे नीतिमान समजले जातो.