How to Read the Psalms of Ascents

आरोहण स्तोत्रे कशी वाचावीत

16/07/2026
The Holy of Holies

परमपवित्र स्थान

23/07/2026
How to Read the Psalms of Ascents

आरोहण स्तोत्रे कशी वाचावीत

16/07/2026
The Holy of Holies

परमपवित्र स्थान

23/07/2026

कर्मांचा करार म्हणजे काय?

What Is the Covenant of Works?

कर्मांच्या करारात, ज्याला कधीकधी निर्मितीचा करार किंवा जीवनाचा करार असेही म्हटले जाते, देवाने आदाम आणि हव्वा यांना बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाण्यास मनाई केली होती (उत्पत्ती 2:15–17). आदाम आणि हव्वा जीवनाच्या स्थितीत दृढपणे स्थापन झाले असते, देवासमोर ते नीतिमान गणले गेले असते आणि त्यांना सार्वकालिक जीवनाचे वतन मिळाले असते.

आदामाबरोबर केलेल्या या कराराला आपण कर्मांचा करार असे म्हणतो, कारण आशीर्वाद मिळविण्याचे साधन मानवी प्रयत्न होते. फलदायी होणे, पृथ्वीवर अधिकार चालवणे, आणि वर्ज्य केलेल्या झाडापासून दूर राहणे, या आज्ञापालनाच्या चांगल्या कर्मांनी आदाम आणि त्याच्या वंशजांसाठी सार्वकालिक जीवन मिळवून दिले असते (उत्पत्ती 1:28; 2:15–17).

आपल्याला माहीत आहेच की, आदाम आणि हव्वा यांनी कर्मांचा करार मोडला, आणि त्यामुळे ते स्वतः व त्यांचे सर्व वंशज, एकमेव येशू सोडून, पापात बुडाले. आदामामध्ये आपण कर्मांचा करार पाळण्याची आपली योग्यता आणि शक्ती गमावली (रोमकरांस पत्र 3:9–20); पण याचा अर्थ असा नाही की हा करार बाजूला ठेवण्यात आला. आपण अजूनही त्याच्या अटींनी बांधील आहोत; परंतु आपल्या दुर्बलतेमुळे, आपल्या जागी दुसऱ्या कोणीतरी मनुष्याने तो पाळावा, हीच आपली एकमेव आशा आहे (गलतीकरांस पत्र 3:10–14). 

आपल्या लोकांकरिता पुन्हा स्वर्ग  मिळवण्यासाठी, येशूला दुसरा आदाम व्हावे लागले. म्हणजेच, त्याला आमच्या प्रतिरूपात येणे आवश्यक होते, जेणेकरून त्याने देवाचे परिपूर्णपणे आज्ञापालन करावे आणि आमचा प्रतिनिधी म्हणून ज्या ठिकाणी आदाम अपयशी ठरला, त्या ठिकाणी त्याने यशस्वी व्हावे. पौल हे स्पष्टपणे शिकवतो (1 करिंथकरांस पत्र 15:45), परंतु समदर्शी शुभवर्तमानांमध्ये आढळणाऱ्या येशूच्या परीक्षेच्या वृत्तांतातही हे सारगर्भित केलेले आपण पाहतो. 

त्याच्या बाप्तिस्म्यानंतर, येशूला अरण्यात नेण्यात आले; तेथे त्याने त्या सैतानाचा सामना केला, ज्याने आदामाची परीक्षा घेण्यासाठी सर्पाचा उपयोग केला होता. पहिला आदाम देवाच्या प्रकट इच्छेऐवजी स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याच्या परीक्षेत पडला. त्याचप्रमाणे दुसऱ्या आदामावर सुद्धा देवाची इच्छा, म्हणजे त्याने दुःखभोगाद्वारे सर्पाचा पराभव करावा, ही देवाची इच्छा सोडून द्यावी, अशी परीक्षा आली, जेव्हा सैतानाने येशूला चुकीच्या वेळी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास किंवा दुःखाशिवाय आणि त्वरित त्याच्या राज्याधिकारात प्रवेश करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला (मत्तय 4:1–11). तथापि, पहिल्या आदामाप्रमाणे नव्हे, तर येशूने सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळवला आणि वधस्तंभावर होणाऱ्या त्याच्या अंतिम पराभवाची पायाभरणी केली (कलस्सैकरांस पत्र 2:13–15).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

लिगोनियर मिनिस्ट्रीज

लिगोनियर मिनिस्ट्रीज

आम्ही डॉ. आर.सी. स्प्रौल यांचे शिक्षण-मंडळ सहकारी आहोत. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत देवाच्या पवित्रतेची घोषणा करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि त्याचे समर्थन करण्यासाठी अस्तित्वात आहोत. आमचे ध्येय, उत्कटता आणि उद्देश लोकांना देव आणि त्याच्या पवित्रतेबद्दलचे ज्ञान वाढण्यास मदत करणे हा आहे.