आरोहण स्तोत्रे कशी वाचावीत
16/07/2026
कर्मांचा करार म्हणजे काय?
21/07/2026आत्मसंयम म्हणजे काय?
आत्मशिस्तीच्या बाबतीत तुम्ही किती समर्पित आहात? बहुधा तुम्ही हा लेख मोबाईल उपकरणावर वाचत असाल, आणि आपल्या जगात आत्मशिस्त खचविण्याचे काम मोबाईल उपकरणांइतके दुसरे काही क्वचितच करीत असेल. तज्ज्ञ आपल्याला सांगतात की सतत स्क्रोल करीत राहण्याची सवय मेंदूतील डोपामाइनच्या सुखद उत्तेजनाचे व्यसन लावते; आणि त्यामुळे आळस व कामात चालढकल वाढविणाऱ्या सवयींना खतपाणी मिळते.
परंतु थोडे आत्मपरीक्षण जर केले, तर आपल्या लक्षात येते की आत्मसंयमाच्या अभावासाठी आपण आपल्या फोनला, किंवा जगातील इतर कोणत्याही भौतिक वस्तूला, दोष देऊ शकत नाही. याचा दोष पूर्णपणे आपल्यातच येतो, कारण आत्मसंयम (सेल्फ-डिसिप्लिन) या शब्दातच त्याचा सुगावा आहे, नाही का?
आत्मसंयम (सेल्फ-डिसिप्लिन) हा शब्द बायबलच्या आधुनिक इंग्रजी आवृत्त्यांमध्ये दिसत नाही, परंतु त्याच्याशी अगदी जवळून संबंधित असलेला, इंद्रियदमन (सेल्फ-कंट्रोल), हा शब्द नक्कीच आढळतो. इंद्रियदमन, म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, हे एक सुभक्तीचे वैशिष्ट्य आहे; खरे तर तो देवासारखा सद्गुण आहे. जेव्हा देवाने आकाश व पृथ्वी निर्माण करायला सुरुवात केली, तेव्हा त्याने एका निश्चित हेतूनुसार आणि एका निश्चित काळमर्यादेत काम केले (उत्पत्ती 1). एका दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत आपण काय करणार आहोत, याची अनिश्चितता बाळगून, जसे सुचेल तसे करीत, त्याने आपले कार्य अस्ताव्यस्त रीतीने केले नाही. आणि आताही तो त्याच रीतीने कार्य करीत आहे (योहान 5:17).
कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. (1 करिंथकर 14:33). आपल्या संस्कृतीत उत्स्फूर्ततेला अनेकदा फार महत्त्व दिले जाते, आणि तिचे योग्य स्थान नक्कीच आहे; परंतु तिचे सहजपणे अविचारी आवेगात रूपांतर होऊ शकते, आणि तो इंद्रियदमनाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून तुम्ही किंवा मी इंद्रियदमन राखतो, तेव्हा आपण आपल्या निर्माणकर्त्याचे अनुकरण करतो. किंबहुना, हे विरोधाभासी वाटत असले तरी, आपण असे म्हणू शकतो की जो मनुष्य सर्वाधिक आत्मसंयमी असतो, तोच सर्वाधिक देवाच्या अधीन असतो.
नव्या करारात असे तीन शास्त्रभाग आहेत, जे आत्मसंयमाचे किंवा इंद्रियदमनाचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित करतात.
1. 1 करिंथकर 9:24–27
पहिला शास्त्रभाग 1 करिंथकर 9:24–27 हा आहे. येथे पौल ख्रिस्ती जीवनाची तुलना मॅरेथॉन धावण्याशी आणि मुष्टियुद्धाच्या सामन्याशी करतो. धावताना सर्व क्रीडापटूंनी पाळले पाहिजे अशा इंद्रियदमनाचे तो वर्णन करतो. आपल्यापैकी बरेच जण खेळाचे वेड असलेल्या समाजात राहत असल्यामुळे, अव्वल क्रीडापटूंनी केवळ स्पर्धेच्या दिवशीच नव्हे, तर दररोज आहार, व्यायाम, प्रशिक्षण आणि झोप यांची कठोर शिस्त पाळली पाहिजे, हे आपल्याला समजते.
पौल हे संपूर्ण ख्रिस्ती जीवनाला लागू करतो: “असे न केल्यास मी दुसर्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (1 करिंथकर 9:27). मॅरेथॉन धावणाऱ्या क्रीडापटूकडे उद्देश किंवा प्रेरणा नसते असे नाही. तसेच ख्रिस्ती मनुष्याबाबतही नाही. आयुष्यभर टिकणारी आत्मशिस्त तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण स्वतःला असे प्रश्न विचारतो: मी कोण आहे? मी येथे कशासाठी आहे? माझी ध्येये कोणती आहेत, आणि ती गाठण्यासाठी मी कोणत्या दिशेने प्रयत्न करावेत? वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझममधील पहिलेच उत्तर थेट मुद्द्यावर येते आणि आपल्याला स्मरण करून देते की “मनुष्याचा मुख्य उद्देश देवाचे गौरव करणे आणि सर्वकाळ त्याचा आनंद घेणे हा आहे.” माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट या सर्वोच्च ध्येयाच्या अधीन असली पाहिजे.
2. गलतीकरांस 5:22–23
दुसरा शास्त्रभाग गलतीकरांस 5:22–23 हा आहे. येथे पौल आत्म्याच्या फळांची यादी करतो: “प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.” लक्षात घ्या की फळांची ही यादी “देहाच्या कर्मांच्या” दुसऱ्या यादीच्या लगेच नंतर येते (गलतीकरांस 5:19–21); आणि आपल्या स्वभावाने ही “देहाची कर्मे” उन्मत्त, अनियंत्रित इच्छा व वासना आहेत. सामान्य व नैसर्गिक मानवी भूक नियंत्रणाबाहेर गेली आहे; ती पुरामुळे काठ ओलांडून वाहणाऱ्या नदीसारखी आहे, ज्यातून सर्वत्र हानी आणि विनाश घडतो.
हे देखील लक्षात घ्या की आत्म्याच्या फळांच्या सुरुवातीला “प्रेम” आणि शेवटी “इंद्रियदमन” आहे. आपल्याला माहीत आहे की नव्या करारात, प्रेमाला बऱ्याचदा सर्वोच्च सद्गुण मानले जाते—“ह्यांत प्रीती श्रेष्ठ आहे” (1 करिंथकर 13:13); परंतु प्रेमालासुद्धा योग्य दिशा आणि योग्य मार्ग मिळाला पाहिजे. इंद्रियदमन, किंवा आत्मसंयम, अन्न, पेय, विश्रांती, लैंगिकता, आनंद, करमणूक आणि अशा इतर सर्व गोष्टींसाठी असलेल्या मानवी भुकेचे अस्तित्व मान्य करतो; परंतु ती काठ ओलांडून अनियंत्रित आवेग व वासनांमध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काळजीपूर्वक मार्ग तयार करतो. म्हणूनच, पौल क्रेत येथे सेवा करीत असलेल्या तीताला लिहिताना, जे बेट स्वैराचारासाठी प्रसिद्ध होते, त्या समाजातील विविध गटांना उद्देशून “इंद्रियदमनी” असण्याची गरज पुन्हा पुन्हा सांगतो, यात काही योगायोग नाही: “वृद्ध पुरुष,” “तरुण स्त्रिया,” “तरुण पुरुष,” आणि खरे तर “सर्व माणसे” (तीत 2:1–12).
3. 2 तीमथ्य 1:7
शेवटी, 2 तीमथ्य 1:7 चा विचार करा: “कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” मला वाटते की एकविसाव्या शतकात जगणाऱ्या विश्वासू ख्रिस्ती लोकांसाठी हे अगदी समयोचित वचन आहे. सभोवतालची संस्कृती अधिकाधिक विरोधी, रागीट आणि असहिष्णू होत चालली आहे; त्यामुळे विरोध आणि दडपण यांच्या समोर विश्वासणारे सहजपणे भयभीत होऊ शकतात. नव्या करारावरून स्पष्ट दिसते की तीमथ्य हा काहीसा मितभाषी आणि भित्र्या स्वभावाचा होता; म्हणूनच त्याला “समयी व असमयी” सेवा करीत राहण्याचा आग्रह करणे आवश्यक होते (2 तीमथ्य 4:2).
या शास्त्रभागातून आपण काढू शकणारा एक व्यावहारिक उपयोग कदाचित थोडा आश्चर्यकारक वाटेल, परंतु तो मौल्यवान आहे. इंद्रियदमन, किंवा आत्मसंयम, ही आपल्याला फार सहज ग्रासू शकणाऱ्या भीती आणि चिंतेवरील उपाय आहे. कारण आत्मसंयमाचे खरे रहस्य म्हणजे त्याच्या लोकांबरोबर असलेली देवाची उपस्थिती आणि देवाचे सामर्थ्य होय. म्हणून ती खरे तर देव-शिस्त आहे, म्हणजे देवाचे वचन आणि देवाचा आत्मा, येशू ख्रिस्ताशी जोडले गेलेले देवाचे मूल म्हणून मी जे काही करतो आणि बोलतो त्या सर्वांचे मार्गदर्शन व नियंत्रण करतात; इतकेच नव्हे, तर मी ख्रिस्ताच्या मनाचाही वाटेकरी झालो आहे (फिलिप्पैकरांस 2:5).आत्मशिस्तीच्या बाबतीत तुम्ही किती समर्पित आहात? बहुधा तुम्ही हा लेख मोबाईल उपकरणावर वाचत असाल, आणि आपल्या जगात आत्मशिस्त खचविण्याचे काम मोबाईल उपकरणांइतके दुसरे काही क्वचितच करीत असेल. तज्ज्ञ आपल्याला सांगतात की सतत स्क्रोल करीत राहण्याची सवय मेंदूतील डोपामाइनच्या सुखद उत्तेजनाचे व्यसन लावते; आणि त्यामुळे आळस व कामात चालढकल वाढविणाऱ्या सवयींना खतपाणी मिळते.
परंतु थोडे आत्मपरीक्षण जर केले, तर आपल्या लक्षात येते की आत्मसंयमाच्या अभावासाठी आपण आपल्या फोनला, किंवा जगातील इतर कोणत्याही भौतिक वस्तूला, दोष देऊ शकत नाही. याचा दोष पूर्णपणे आपल्यातच येतो, कारण आत्मसंयम (सेल्फ-डिसिप्लिन) या शब्दातच त्याचा सुगावा आहे, नाही का?
आत्मसंयम (सेल्फ-डिसिप्लिन) हा शब्द बायबलच्या आधुनिक इंग्रजी आवृत्त्यांमध्ये दिसत नाही, परंतु त्याच्याशी अगदी जवळून संबंधित असलेला, इंद्रियदमन (सेल्फ-कंट्रोल), हा शब्द नक्कीच आढळतो. इंद्रियदमन, म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, हे एक सुभक्तीचे वैशिष्ट्य आहे; खरे तर तो देवासारखा सद्गुण आहे. जेव्हा देवाने आकाश व पृथ्वी निर्माण करायला सुरुवात केली, तेव्हा त्याने एका निश्चित हेतूनुसार आणि एका निश्चित काळमर्यादेत काम केले (उत्पत्ती 1). एका दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत आपण काय करणार आहोत, याची अनिश्चितता बाळगून, जसे सुचेल तसे करीत, त्याने आपले कार्य अस्ताव्यस्त रीतीने केले नाही. आणि आताही तो त्याच रीतीने कार्य करीत आहे (योहान 5:17).
कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. (1 करिंथकर 14:33). आपल्या संस्कृतीत उत्स्फूर्ततेला अनेकदा फार महत्त्व दिले जाते, आणि तिचे योग्य स्थान नक्कीच आहे; परंतु तिचे सहजपणे अविचारी आवेगात रूपांतर होऊ शकते, आणि तो इंद्रियदमनाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून तुम्ही किंवा मी इंद्रियदमन राखतो, तेव्हा आपण आपल्या निर्माणकर्त्याचे अनुकरण करतो. किंबहुना, हे विरोधाभासी वाटत असले तरी, आपण असे म्हणू शकतो की जो मनुष्य सर्वाधिक आत्मसंयमी असतो, तोच सर्वाधिक देवाच्या अधीन असतो.
नव्या करारात असे तीन शास्त्रभाग आहेत, जे आत्मसंयमाचे किंवा इंद्रियदमनाचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित करतात.
1. 1 करिंथकर 9:24–27
पहिला शास्त्रभाग 1 करिंथकर 9:24–27 हा आहे. येथे पौल ख्रिस्ती जीवनाची तुलना मॅरेथॉन धावण्याशी आणि मुष्टियुद्धाच्या सामन्याशी करतो. धावताना सर्व क्रीडापटूंनी पाळले पाहिजे अशा इंद्रियदमनाचे तो वर्णन करतो. आपल्यापैकी बरेच जण खेळाचे वेड असलेल्या समाजात राहत असल्यामुळे, अव्वल क्रीडापटूंनी केवळ स्पर्धेच्या दिवशीच नव्हे, तर दररोज आहार, व्यायाम, प्रशिक्षण आणि झोप यांची कठोर शिस्त पाळली पाहिजे, हे आपल्याला समजते.
पौल हे संपूर्ण ख्रिस्ती जीवनाला लागू करतो: “असे न केल्यास मी दुसर्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (1 करिंथकर 9:27). मॅरेथॉन धावणाऱ्या क्रीडापटूकडे उद्देश किंवा प्रेरणा नसते असे नाही. तसेच ख्रिस्ती मनुष्याबाबतही नाही. आयुष्यभर टिकणारी आत्मशिस्त तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण स्वतःला असे प्रश्न विचारतो: मी कोण आहे? मी येथे कशासाठी आहे? माझी ध्येये कोणती आहेत, आणि ती गाठण्यासाठी मी कोणत्या दिशेने प्रयत्न करावेत? वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझममधील पहिलेच उत्तर थेट मुद्द्यावर येते आणि आपल्याला स्मरण करून देते की “मनुष्याचा मुख्य उद्देश देवाचे गौरव करणे आणि सर्वकाळ त्याचा आनंद घेणे हा आहे.” माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट या सर्वोच्च ध्येयाच्या अधीन असली पाहिजे.
2. गलतीकरांस 5:22–23
दुसरा शास्त्रभाग गलतीकरांस 5:22–23 हा आहे. येथे पौल आत्म्याच्या फळांची यादी करतो: “प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.” लक्षात घ्या की फळांची ही यादी “देहाच्या कर्मांच्या” दुसऱ्या यादीच्या लगेच नंतर येते (गलतीकरांस 5:19–21); आणि आपल्या स्वभावाने ही “देहाची कर्मे” उन्मत्त, अनियंत्रित इच्छा व वासना आहेत. सामान्य व नैसर्गिक मानवी भूक नियंत्रणाबाहेर गेली आहे; ती पुरामुळे काठ ओलांडून वाहणाऱ्या नदीसारखी आहे, ज्यातून सर्वत्र हानी आणि विनाश घडतो.
हे देखील लक्षात घ्या की आत्म्याच्या फळांच्या सुरुवातीला “प्रेम” आणि शेवटी “इंद्रियदमन” आहे. आपल्याला माहीत आहे की नव्या करारात, प्रेमाला बऱ्याचदा सर्वोच्च सद्गुण मानले जाते—“ह्यांत प्रीती श्रेष्ठ आहे” (1 करिंथकर 13:13); परंतु प्रेमालासुद्धा योग्य दिशा आणि योग्य मार्ग मिळाला पाहिजे. इंद्रियदमन, किंवा आत्मसंयम, अन्न, पेय, विश्रांती, लैंगिकता, आनंद, करमणूक आणि अशा इतर सर्व गोष्टींसाठी असलेल्या मानवी भुकेचे अस्तित्व मान्य करतो; परंतु ती काठ ओलांडून अनियंत्रित आवेग व वासनांमध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काळजीपूर्वक मार्ग तयार करतो. म्हणूनच, पौल क्रेत येथे सेवा करीत असलेल्या तीताला लिहिताना, जे बेट स्वैराचारासाठी प्रसिद्ध होते, त्या समाजातील विविध गटांना उद्देशून “इंद्रियदमनी” असण्याची गरज पुन्हा पुन्हा सांगतो, यात काही योगायोग नाही: “वृद्ध पुरुष,” “तरुण स्त्रिया,” “तरुण पुरुष,” आणि खरे तर “सर्व माणसे” (तीत 2:1–12).
3. 2 तीमथ्य 1:7
शेवटी, 2 तीमथ्य 1:7 चा विचार करा: “कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” मला वाटते की एकविसाव्या शतकात जगणाऱ्या विश्वासू ख्रिस्ती लोकांसाठी हे अगदी समयोचित वचन आहे. सभोवतालची संस्कृती अधिकाधिक विरोधी, रागीट आणि असहिष्णू होत चालली आहे; त्यामुळे विरोध आणि दडपण यांच्या समोर विश्वासणारे सहजपणे भयभीत होऊ शकतात. नव्या करारावरून स्पष्ट दिसते की तीमथ्य हा काहीसा मितभाषी आणि भित्र्या स्वभावाचा होता; म्हणूनच त्याला “समयी व असमयी” सेवा करीत राहण्याचा आग्रह करणे आवश्यक होते (2 तीमथ्य 4:2).
या शास्त्रभागातून आपण काढू शकणारा एक व्यावहारिक उपयोग कदाचित थोडा आश्चर्यकारक वाटेल, परंतु तो मौल्यवान आहे. इंद्रियदमन, किंवा आत्मसंयम, ही आपल्याला फार सहज ग्रासू शकणाऱ्या भीती आणि चिंतेवरील उपाय आहे. कारण आत्मसंयमाचे खरे रहस्य म्हणजे त्याच्या लोकांबरोबर असलेली देवाची उपस्थिती आणि देवाचे सामर्थ्य होय. म्हणून ती खरे तर देव-शिस्त आहे, म्हणजे देवाचे वचन आणि देवाचा आत्मा, येशू ख्रिस्ताशी जोडले गेलेले देवाचे मूल म्हणून मी जे काही करतो आणि बोलतो त्या सर्वांचे मार्गदर्शन व नियंत्रण करतात; इतकेच नव्हे, तर मी ख्रिस्ताच्या मनाचाही वाटेकरी झालो आहे (फिलिप्पैकरांस 2:5).
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.