
मी माझ्या तारणाची खातरजमा करू शकतो का?
26/09/2025सुवार्ता म्हणजे काय?
सुवार्ता म्हणजे काय?
अनेक लोकांना वाटते की देव चांगला असल्याने, जर आपण चांगले जीवन जगतो तर तो नक्कीच आपल्याला जवळ करेल. परंतु हे शुभवर्तमान नाही, कारण आपल्यापैकी कोणीही देवाची बरोबरी करण्याइतपत सात्त्विक नाही. जर आपण आपल्या स्वतःच्या भरवशावर राहिलो, तर आपल्या जीवनाला जे योग्य आहे तेच आपल्याला मिळेल: म्हणजे देवाचा न्याय.
या पुस्तिकेत, डॉ. आर.सी. स्प्रौल यांनी सुवार्ता स्पष्ट केली आहे—जी आपल्यासारख्या पापी लोकांसाठी देवाची 'आनंदाची बातमी' आहे. आपण त्याच्या न्याय्य दंडापासून स्वतःला कधीही वाचवू शकत नाही, म्हणून देव आपल्याला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतो, जो एकटाच त्याच्या नीतिमान जीवनाद्वारे, प्रायश्चित्तकारक मृत्यूद्वारे आणि विजयी पुनरुत्थानाद्वारे आपल्याला मुक्त करू शकतो.
डॉ. आर. सी. स्प्रौल यांच्या द क्रूशियल क्वेश्चन्स पुस्तिकामालिकेत ख्रिस्ती लोक आणि गंभीरपणे चौकशी करणारे लोक वारंवार विचारत असलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची संक्षिप्त उत्तरे दिली आहेत.
आर. सी. स्प्रौल
डॉ. आर. सी. स्प्रौल हे लिगोनियर मिनिस्ट्रीज या संस्थेचे संस्थापक होते. ते सेंट अँड्र्यूज चॅपे, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील प्रथम उपदेशक आणि शिक्षक होते. ते रिफॉर्मेशन बायबल कॉलेजचे पहिले अध्यक्ष होते आणि टेबलटॉक मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा रिन्यूइंग युवर माइंड हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ स्टेशनवर दररोज प्रसारित केला जातो आणि ऑनलाइनही ऐकता येतो. त्यांनी द होलीनेस ऑफ गॉड, चोजन बाय गॉड, आणि एव्हरीवन्स अ थिओलॉजियन या सह शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. डॉ. स्प्रौल यांना संपूर्ण जगभर देवाचे वचन अचूक आणि त्रुटीरहित आहे या सत्याचे प्रभावी आणि स्पष्ट समर्थन करणारे म्हणून ओळखले जाते. देवाच्या लोकांनी त्याच्या वचनावर ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे — या गोष्टीवर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भर दिला.

