मी माझ्या तारणाची खातरजमा करू शकतो का?
मला ताराणाची खरी खात्री कशी मिळेल?
आज मंडळीतील अनेक लोक ताराणाविषयीच्या शंका आणि संभ्रम यामुळे व्याकुळ झालेले आहेत. मात्र, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी आपल्याला ताराणाची ठाम खात्री बाळगणे एवढेच नाही, तर पवित्रशास्त्र त्यांना आपले पाचारण व निवड ही देखील दृढ करावी अशी आज्ञा देते (२ पेत्र १:१०).
या लघुपुस्तिकेत डॉ. आर. सी. स्प्रोल विश्वासणाऱ्यांना याच उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतात. सुबोध आणि थोडक्याच प्रकरणाद्वारे ते ताराणाची खात्री म्हणजे काय, ती कशी प्राप्त करता येते, तिच्यामुळे मिळणारे आशीर्वाद कोणते, याचे स्पष्टीकरण देतात आणि खोट्या खात्रीमुळे उद्भवणाऱ्या भयानक परिणामांविषयी सावध करतात.
डॉ. आर सी स्प्रौल यांची क्रुशियल क्वेश्चन्स हि लघुपुस्तक–मालिका, ख्रिस्ती विश्वासणारा आणि विचारशील शोधक यांनी वारंवार विचारणाऱ्या गंभीर प्रश्नांची संक्षिप्त पण आशयघन उत्तरे देण्याचा प्रयत्न करते.
आर. सी. स्प्रौल
डॉ. आर. सी. स्प्रौल हे लिगोनियर मिनिस्ट्रीज या संस्थेचे संस्थापक होते. ते सेंट अँड्र्यूज चॅपे, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील प्रथम उपदेशक आणि शिक्षक होते. ते रिफॉर्मेशन बायबल कॉलेजचे पहिले अध्यक्ष होते आणि टेबलटॉक मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा रिन्यूइंग युवर माइंड हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ स्टेशनवर दररोज प्रसारित केला जातो आणि ऑनलाइनही ऐकता येतो. त्यांनी द होलीनेस ऑफ गॉड, चोजन बाय गॉड, आणि एव्हरीवन्स अ थिओलॉजियन या सह शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. डॉ. स्प्रौल यांना संपूर्ण जगभर देवाचे वचन अचूक आणि त्रुटीरहित आहे या सत्याचे प्रभावी आणि स्पष्ट समर्थन करणारे म्हणून ओळखले जाते. देवाच्या लोकांनी त्याच्या वचनावर ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे — या गोष्टीवर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भर दिला.
