Love's Attributes

प्रीतीचे गुणविशेष

06/08/2026
What Do Christians Believe About Divine Revelation?

ख्रिस्ती लोक देवाच्या प्रकटीकरणाविषयी काय विश्वास ठेवतात?

13/08/2026
Love's Attributes

प्रीतीचे गुणविशेष

06/08/2026
What Do Christians Believe About Divine Revelation?

ख्रिस्ती लोक देवाच्या प्रकटीकरणाविषयी काय विश्वास ठेवतात?

13/08/2026

येशूचा मृत्यू कधी झाला होता?

When Did Jesus Die?

दरवर्षी जगभरातील ख्रिस्ती लोक पुनरुत्थान दिन, म्हणजे इस्टर, साजरा करतात. हा सण येशू ख्रिस्ताच्या कबरेतून झालेल्या पुनरुत्थानाच्या स्मृतीप्रत्यर्थ साजरा केला जातो. नासरेथच्या येशूचे मरण केवळ धार्मिक स्मरणाचा विषय नाही, तर ते एक ऐतिहासिक सत्यही आहे. पहिल्या आणि दुसऱ्या शतकांतील बायबलबाह्य लिखाणांत नासरेथच्या येशूविषयी अनेक उल्लेख आढळतात, जसे टॅसिटस, जोसेफस, फायलो आणि ताल्मूद.

आधुनिक काळात आपण जशी अपेक्षा करतो, तशी वधस्तंभावरील मृत्यूची नेमकी तारीख बायबल देत नाही; तरी त्याची वेळ आणि ठिकाण यांविषयी शंका-कुशंकांसाठी स्थान राहत नाही. या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ लक्षात घेतला, तर “येशू तीन दिवस कबरेत होता का?” या प्रश्नाचे उत्तर देताना ज्या तर्काचा आपण उपयोग करतो, त्याच तर्काने येथेही उपयोग केला जातो. नासरेथचा येशू शुक्रवार, 3 एप्रिल, इ.स. 33 रोजी, नवव्या प्रहराला, म्हणजे दुपारी 3 वाजता, यरुशलेम नगराजवळील, नगरद्वाराबाहेरच्या गलगथा येथे वधस्तंभावर मरण पावला, हे व्यापकपणे मान्य केले जाते. ग्रीक भाषेत “कवटीचे ठिकाण” असा अर्थ असलेले गलगथा, हे रोमी लोकांच्या हातून गुन्हेगारांना वधस्तंभावर खिळण्याचे एक नेहमीचे ठिकाण होते.

येशूच्या सर्वांसमक्ष झालेल्या मरणाचे महत्त्व आपण विचारात घेतले पाहिजे. शुभवर्तमानांची वृत्तांते येशूला मारण्याचा कट, तसेच  वल्हांडण सणात ज्याला क्षमा करून सोडून देण्यात आले होते त्या बरब्बा या कैद्याशी त्याची केलेली अदलाबदल प्रकट करतात (पाहा मत्तय 27; मार्क 14–15; लूक 23; योहान 11; 19). यहूदीयाचा पाचवा राज्यपाल पंतय पिलात याने, तो लोकांच्या दबावाला बळी पडला असो वा त्या कटात सहभागी असो, येशूला तातडीने देहान्त शिक्षा देण्याची आज्ञा दिली. मृत्यूविषयी कोणतीही गुप्तता किंवा केवळ मृत्यूचा आभास राहू नये, अशा रीतीने ही शिक्षेची पद्धत आखली गेली होती. त्यात मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे छळ होते आणि या उघड्या मैदानावरील तमाशात अपमान करण्यासाठी लोकसमुदायाचा सहभाग होता.

शिवाय, येशूचा मृत्यू नेमक्या कोणत्या क्षणी झाला याची सुद्धा नोंद करण्यात आली आहे. शुभवर्तमानाचे लेखक त्याच्या शेजारी वधस्तंभावर खिळलेल्या दोन लुटारूंच्या बोलण्याचे वर्णन करतात (पाहा मत्तय 27:38–44; लूक 23:32–43). येशूचे शेवटचे शब्द देखील नोंदवले गेले आहेत, जेव्हा त्याने शेवटची आरोळी देऊन “आपला आत्मा सोपवून दिला” तेव्हा “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले (योहान 19:30; मत्तय 27:50 देखील पाहा). मार्क एका महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शीची, म्हणजे सुभेदाराची प्रतिक्रिया नोंदवतो. येशूला “अशा रीतीने प्राण सोडताना पाहून” त्याने हे उद्गार काढले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता!” (मार्क 15:39). 

येशूच्या मृत्यूच्या आणि पुनरुत्थानाच्या कालक्रमाला आव्हान देणारे काही युक्तिवाद मांडले जातात. त्यांपैकी मूर्च्छा-सिद्धांत (स्वून थिअरी) असा दावा करतो की येशू वधस्तंभावर मरण पावला नाही, तर तो केवळ बेशुद्ध झाला होता. हे शक्य असले, तरी काळाच्या वास्तवावरून इतके तरी स्पष्ट होते की नासरेथचा येशू खरोखर मरण पावला. ऐतिहासिक नोंदी आणि शुभवर्तमानांची वृत्तांते वधस्तंभावर झालेल्या त्याच्या सार्वजनिक मृत्यूची वेळ आणि त्याची पद्धत यांचे महत्त्व दाखवितात. येशूचे मरण अत्यंत क्रूर होते, तरी ते आकस्मिक नव्हते किंवा देवाच्या सार्वभौम नियंत्रणाबाहेरही नव्हते; उलट, “आपण अशक्त असतानाच ख्रिस्त योग्य वेळी अभक्तांसाठी मरण पावला” (रोमकरांस पत्र 5:6). 

यावरून आपल्याला हे समजते की, क्रूसावरील येशूचा मृत्यू ही केवळ एक शारीरिक घटना नव्हती, तर ते आध्यात्मिक वास्तवही प्रकट करते. त्याचे मरण यज्ञार्पणाचे आणि कराराशी निगडित असल्यामुळे अद्वितीय होते. हीच सुवार्ता आहे. येशू केवळ एक चांगला मनुष्य किंवा ज्ञानी शिक्षक नाही, तर तो शेवटचा आदाम आहे. प्रेषित पौल स्पष्ट करतो की, “कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. ” (रोमकरांस पत्र 5:19). येशू देव-मनुष्य आहे, जसे सुभेदारानेही ओळखले होते; म्हणून त्याने आपल्या देहात अर्पण केलेले बलिदान त्याच्याशी एकरूप झालेल्यांसाठी चिरकालिक प्रभावकारक आहे.

नासरेथच्या येशूच्या मृत्यूमुळे आणखी अनेक प्रश्न उपस्थित होतात: येशू कोण आहे? जग आजही त्याच्या मृत्यूविषयी का बोलते? सर्व सजीव प्राणी मृत्यूच्या अधीन का आहेत? पवित्र शास्त्र या सर्व प्रश्नांची उत्तरे देते आणि आपल्या स्वतःच्या मृत्यूचा विचार करण्यास आपल्याला प्रवृत्त करते. क्रूसाचे दृश्य आपल्याला हे मान्य करण्यास भाग पाडते की, न्यायालयात एखाद्या गुन्ह्यासाठी आपल्याला कधीही दोषी ठरविण्यात आले नसले, तरी आपल्यावर मरणदंडाची आज्ञा आहे. जरी आपण आपली नश्वरता नाकारण्याचा आटोकाट प्रयत्न करत असलो, तरी मृत्यूच्या अनपेक्षित धोक्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याच्या अंतासाठी पूर्णपणे सिद्ध होण्यातील आपली असमर्थता आपल्याला कबूल करायला लावत नाही. आपला निर्माणकर्ता देव जसा आपल्याशी प्रामाणिक आहे, तसेच आपणही स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे: “कारण पापाचे वेतन मरण आहे” (रोमकरांस पत्र 6:23). म्हणून ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे आपण आनंद मानतो, कारण “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्यामध्ये देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे” (2 करिंथ 5:21).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

मेरेडिथ ली मायर्स

मेरेडिथ ली मायर्स

मेरेडिथ ली मायर्स ह्या टेबलटॉक आणि लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या वेब संपादक आहेत, आणि आपण कोलंबिया, साऊथ कॅरोलिना येथील अर्सकिन थिओलॉजिकल सेमिनरीमधून पदवी पूर्ण केली आहे.