Why Do We Sing at Christmas?

आपण ख्रिसमसला गीते का गातो?

14/08/2026
Why Do We Sing at Christmas?

आपण ख्रिसमसला गीते का गातो?

14/08/2026

आपण आपल्या “बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग” कसा करावा?

How Are We to “Improve Our Baptism”,?

एकदा एका राणीने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या समारंभात सोडले, आणि त्याला आठवण करून दिली: “लक्षात ठेव, राजपुत्रा, राजघराण्यातील पुत्रांचे आचरणही राजेशाहीस शोभेल असे असते.”

ख्रिस्ती लोक, म्हणून, राजकीय याजकगणाचे सदस्य आणि स्वर्गीय राजाच्या पवित्र राष्ट्राचे नागरिक या नात्याने आपल्या नावास साजेसे जीवन जगणे हे आपले कर्तव्य आहे (1 पेत्र 2:9). बाप्तिस्मा ह्या विधी-संस्काराकडे आपण एक प्रकारचा “नव्या जन्माचा दाखला” म्हणून पाहू शकतो, कारण आपण त्रैक्य देवाच्या नावाने शिक्का मोर्तब  झालो आहोत, याची तो भक्कम पुरावा देतो (मत्तय 28:19).

वेस्टमिन्स्टर लार्जर कॅटेकिझमध्ये बाप्तिस्म्याविषयी एक प्रश्न आहे, “आपण बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग कसा करावा?” (प्रश्न व उत्तर 167). स्पष्ट सांगायचे तर, आपला बाप्तिस्मा होतो त्यावेळी आपल्याला दिलेल्या नावात कोणत्याही विकास करण्याची वा ते उन्नत  करण्याची गरज नाही, कारण ते पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे परिपूर्ण व सर्वार्थाने पर्याप्त नाव आहे. परंतु या दैवी नावाच्या तारणदायी सामर्थ्याविषयी विश्वासणाऱ्याची समज आणि त्याचा व्यावहारिक उपयोग हे आयुष्यभर उन्नत होत गेले पाहिजेत, आणि तसे व्हायला सुद्धा पाहिजे.

तर मग, आपण आपल्या बाप्तिस्म्याचा उन्नत उपयोग कसा करावा?

1. बाप्तिस्मा ही देणगी आहे, हे आपण लक्षात ठेवतो.

बाप्तिस्मा हे मरणातून उठलेल्या प्रभूने आपल्या मंडळीस दिलेल्या कृपेचे चिन्ह आणि शिक्का आहे. ज्यांना तो प्राप्त होतो, त्यांच्या जीवनात बाप्तिस्मा खरोखरच एक निर्णायक वळण ठरतो. या अर्थाने, मिसरमधून बाहेर पडताना इस्राएलाने कोरड्या भूमीवरून तांबडा समुद्र पार केला, त्या अनुभवाशी त्याचे साम्य जोडले गेले आहे (पाहा 1 करिंथकर 10:1–2). करारातील लोकांना इतक्या जीवघेण्या संकटातून मिळालेल्या सुटकेचा विसर पडणे हे अकल्पनीय आहे. त्याचप्रमाणे, आपल्या बाप्तिस्म्याचे स्मरण करणे म्हणजे त्याचे महत्त्व जाणणे होय: विश्वासाने आपण ख्रिस्ताचे मरण आणि त्याचे पुनरुत्थान यांत त्याच्याशी एकरूप झालो आहोत (रोमकरांस 6:1–4). म्हणून आपल्या बाप्तिस्म्याचे स्मरण करणे म्हणजे पुढील गोष्टींच्या खातरीविषयी स्वतःला सातत्याने जागृत ठेवण्याचा एक मार्ग आहे:

मी माझा स्वतःचा नाही,
तर शरीराने व आत्म्याने, जीवनात आणि मरणातही,
माझा विश्वासू तारणकर्ता जो येशू ख्रिस्त त्याचा आहे.
(हायडेलबर्ग कॅटेकिझम 1)

2. आपण प्रभूसमोर आपल्या पापांची कबुली देत राहतो.

ऑगस्टीन यांनी लिहिले आहे, “देवाच्या संपूर्ण नगराची त्यांच्या यात्रेकरू अवस्थेतील प्रार्थना पाहा; कारण ती आपल्या सर्व सदस्यांच्या मुखाने देवाकडे अशी आरोळी मारते, ‘जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे,तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड;’ बाप्तिस्मा घेतलेले लोक म्हणून, आपण पापरहित आहोत या खोट्या समजुतीचा स्वीकार करू नये; उलट, आपण देव जो पिता ह्याच्यासमोर पश्चात्तापी अंतःकरणाने आपली पापे पदरात घेऊन त्यांची कबुली द्यावी (1 योहान 1:8–9).

घरातील कामे करीत असताना, साफसफाईची वेळ येईपर्यंत आपल्याला एखादी वस्तू किती घाणेरडी आहे, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. आपल्या ख्रिस्ती वाटचालीविषयी हे कितीतरी अधिक खरे आहे: देवाच्या वचनाचा प्रकाश आपल्या अंतःकरणातील कानाकोपऱ्यांवर पडतो तेव्हाच, आपल्या भ्रष्टतेची मुळे किती खोलवर गेलेली आहेत, हे आपल्याला दिसते. आणि आपल्या बाप्तिस्म्याचे स्मरण करीत असताना, आपल्या पापांच्या खोलवर पसरलेल्या वास्तवाला सामोरे जाताना देवाच्या या अभिवचनातून आपल्याला सांत्वन प्राप्त होते: “परंतु तो अधिक कृपा देतो” (याकोब 4:6). 

3. आपल्या ठायी कार्यरत असलेल्या देवाच्या पवित्रीकरण करणाऱ्या सामर्थ्याचा आपण उपयोग करण्याचा प्रयत्न करतो.

आपल्या व्यापक संस्कृतीत संभाव्य ऊर्जा-टंचाईची, तसेच तंत्रज्ञान आणि वाहतूक यांच्या गरजांसाठी ऊर्जेचे विश्वासार्ह स्रोत शोधण्याची बरीच चर्चा होत राहते. परंतु ख्रिस्ती जीवनाच्या संदर्भात, पवित्र केलेला व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये ख्रिस्ताचे स्वतःचे अक्षय पुनरुत्थानाचे सामर्थ्य आणि शक्ती कार्यरत असते (इफिसकरांस 1:19–20). खरेच, आपल्या बाप्तिस्म्याचे स्मरण आपल्याला “विश्वासाची चांगली लढाई” लढण्यासाठी धैर्याने आणि निर्भयपणे पुढे जाण्यास प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरले पाहिजे (1 तीमथ्य 6:12). असा कोणताही शत्रू नाही ज्याचा आपण सामना करू शकत नाही किंवा ज्याच्यासमोर आपण शक्तीने कमी पडू. हे दृश्य आणि अदृश्य, खालील आणि वरील, अशा दोन्ही शत्रूंना लागू होते. आपण आपल्या फुगवलेल्या स्नायूंचे बळ किंवा युद्धकलेचे कौशल्य घेऊन रिंगणात उतरतो, असे नाही; तर ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे, ज्यात आपल्या बाप्तिस्म्याचाही समावेश आहे, आपल्याला हा विश्वास देतो: “कारण त्याने म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. ‘” (इब्री 13:5). 

4. आपल्यापैकी कोणीही एकटा उभा राहत नाही किंवा एकटा चालत नाही, हे आपण लक्षात ठेवतो.

बाप्तिस्मा हे देवाचे आपल्याला एकत्र बांधण्याचे कार्य आहे: तो आपल्याला अनेक अवयवांपासून एक शरीर बनवतो (1 करिंथकर 12:13). म्हणून बाप्तिस्मा आपल्याला मंडळीतील इतरांच्या विविध देणग्यांना आणि कार्यांना महत्त्व देण्यास पाचारण करतो, कारण प्रत्येक जण संपूर्ण शरीराच्या कल्याणासाठी आणि वृद्धीसाठी आपले योगदान देतो (1 करिंथकर 12:14–31). शेक्सपिअरच्या सुप्रसिद्ध कवितेत, “ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज” मध्ये मानवी जीवन सात अंकांत विभागलेल्या नाटकासारखे चित्रित केले आहे; आणि प्रत्येक वयात व जीवनाच्या प्रत्येक ऋतूत, “तो आपली भूमिका बजावतो.” परंतु बाप्तिस्मा आपल्याला प्रमुख भूमिका गाजविण्यापेक्षा सेवक म्हणून कार्य करण्याची भूमिका देतो. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींपेक्षा मंडळीच्या सामूहिक हिताला अग्रक्रम देत, आधार देण्यासाठी आणि उन्नती करण्यासाठी “आपली भूमिका बजावण्यास” आपण तत्पर असले पाहिजे. “आधी देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधणे” याचा अर्थ काय, यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे (मत्तय 6:33).

बाप्तिस्मा हा आपल्या शिष्यत्वासाठी असलेल्या पाचारणाशी निगडित आहे; कारण ख्रिस्त त्याद्वारे आपल्याला असे पाचारण करतो: “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. (लूक 9:23).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

केन माँटगोमेरी

केन माँटगोमेरी

रेव्हरंड केन माँटगोमेरी हे मेरीएटा, जॉर्जिया येथील ख्रिस्त ऑर्थोडॉक्स प्रेस्बिटेरियन चर्चचे पाळक आहेत.