What Do Christians Believe About Divine Revelation?

ख्रिस्ती लोक देवाच्या प्रकटीकरणाविषयी काय विश्वास ठेवतात?

13/08/2026
How Are We to “Improve Our Baptism”,?

आपण आपल्या “बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग” कसा करावा?

14/08/2026
What Do Christians Believe About Divine Revelation?

ख्रिस्ती लोक देवाच्या प्रकटीकरणाविषयी काय विश्वास ठेवतात?

13/08/2026
How Are We to “Improve Our Baptism”,?

आपण आपल्या “बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग” कसा करावा?

14/08/2026

आपण ख्रिसमसला गीते का गातो?

Why Do We Sing at Christmas?

इतिहासात सर्वत्र, लोकांना गाण्याची फार आवड राहिली आहे. मग ते बेसबॉलचे सामने असोत किंवा वाढदिवसाच्या समारंभांतले गीतगायन असो, आपण उत्साहाने गीते गातो आणि पुष्कळ प्रसंगी आपण आपल्या नैसर्गिक गायनकौशल्याचा अभावही लोकांसमोर उघड करतो. समूहाने गाणे, विशेषतः ख्रिसमसच्या काळात गाणे, ही एक सांस्कृतिक परंपराच झाली आहे. परंतु कॅरल्स आणि स्तोत्रे गाणे, जरी आपण ती अत्यंत कुशलतेने गात असलो, आणि शब्दांच्या अर्थात सुद्धा आपल्याला रस नसला, तरी कॅरल्स आणि स्तोत्रे गाण्याचा आपल्यावर इतका खोल परिणाम का होतो? 

उपासनेतील गीतगायनाने ते कसे आणि का केले पाहिजे, या प्रश्नाविषयी व्यासपीठावरील सेवकांना आणि मंडळीतील लोकांना नेहमीच विचार करण्यास भाग पाडले आहे. 1761 मध्ये जॉन वेस्ली यांनी या विषयावर मेथडिस्ट मंडळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी “गाण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे” (Directions for Singing) लिहिली होती. आपल्या प्रकाशनापासून, त्यांचा प्रभाव केवळ मेथडिस्ट लोकांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांतील दोन तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत: 

जोमाने आणि धैर्याने गा. अर्धमेलेल्यासारखे किंवा अर्धवट झोपेत असल्यासारखे गाण्यापासून सावध राहा; परंतु आपला आवाज ताकदीने उंच करा. पूर्वी तुम्ही सैतानाची गीते गात होता तेव्हा स्वतःचा आवाज उंचविण्यास तुम्हाला भीती वाटत नव्हती, किंवा तो इतरांना ऐकू जाईल याची लाज वाटत नव्हती, तशी आताही तुमच्या आवाजाची भीती किंवा लाज बाळगू नका.

नम्रतेने गा. मंडळीतील इतरांपेक्षा आपलाच आवाज अधिक किंवा वेगळा ऐकू यावा म्हणून ओरडून गाऊ नका, जेणेकरून तुमच्यामुळे सुसंवाद नष्ट होणार नाही. उलट, आपला सामूहिक आवाज एकत्र करून एक सुमधुर ध्वनी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. 

आपल्या मर्यादा असल्या तरी ख्रिसमसच्या वेळी आपण “आपला आवाज ताकदीने उंच करतो.” याचे कारण कदाचित असे असावे की ती गीते आपल्याला चांगलीच परिचित असतात. परिचितपणा हा सहभागाला प्रोत्साहन देणारा बंध असतो. प्रेषित पौलाने कौशल्याची पातळी काहीही असो, ख्रिस्ती लोकांनी “देवाच्या प्रती आपल्या अंतःकरणात कृतज्ञतेने” गावे, असे उत्तेजन दिले आहे (कलस्सैकर 3:16).  

गाणे कसे शिकायचे हे सुरू करण्यासाठी मंडळी हे सर्वांत सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. स्तोत्रसंहितेतील गीते, भजन आणि आध्यात्मिक गीते आयुष्यभर आपल्या स्मरणात राहतात. वय वाढत गेले तरी ती आपण विसरत नाही, कारण तज्ज्ञांच्या मते गाण्याची कृती आपल्या मेंदूत साठविलेल्या शब्दांच्या आणि स्वरांच्या स्मृती सक्रिय करते. ख्रिसमसच्या काळात वृद्धाश्रमांत, पूर्वी कोणत्याही गायन-वादनात सहभागी न झालेले रहिवासीही “जॉय टू द वर्ल्ड” आणि “सायलेंट नाईट” गाण्यास उत्साहाने पुढे येतात.

ख्रिसमसची अनेक गीते केवळ आनंद देत नाहीत, तर ती शिकवितातही; ती सिद्धांताने समृद्ध असतात. मार्टिन ल्यूथर यांनी 1520 च्या दशकात आणि त्यानंतर स्थापन झालेल्या नव्या ल्यूथरन मंडळ्यांच्या वाढीसाठी गीतगायनाचा महत्त्वाचा उपयोग केला. त्यांनी कोरल, म्हणजे धर्मोपदेशक सामुहिक स्तोत्रगीते आणि कॅटेकिझम गायले, कारण या नव्या मंडळ्यांना शिकविण्यासाठी गीत हे एक प्रभावी साधन होते.

गायन-वादन हे ख्रिस्ती समुदायात आपली सातत्याने जडणघडण करते. सेंट अँड्र्यूज चॅपलमध्ये आर. सी. स्प्रौल केवळ सवयीने उपासना करण्याऐवजी, उपासना का केली जाते हे स्पष्ट करण्यासाठी अनेकदा वेळ देत असत. एखादे गीत संपल्यानंतर ते विचारत, “तुम्ही आत्ताच जे गात होता, त्याचा अर्थ तुम्हाला समजला का?” त्यांच्या मते, गीतगायन हे देवाच्या वचनाला पचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण एन्झाईम, म्हणजेच देवाचे वचन आत्मसात करण्यास साहाय्य करणारे एक अत्यावश्यक माध्यम होते.  

ख्रिसमसच्या कॅरल्समध्ये ईश्वरशास्त्र कसे कार्य करते? आपण काही उदाहरणे पाहू.

“जॉय टू द वर्ल्ड, द लॉर्ड हॅज कम”

हे लोवेल मेसन यांनी हँडलच्या धुनीवरून रचलेल्या “अँटीओक” या चालीवर गायले जाते. आयझॅक वॉट्स यांचे शब्द गौरव, सार्वभौमत्व, पवित्रता, सत्य आणि कृपा या विषयांचा पाठपुरावा घेतात. कोणत्याही उपदेशकाने उद्धृत करावेत, अशा देवाच्या गुणविशेषांची ती एक सूची आहे. 

“ओ कम, ओ कम, इमॅन्युएल”

हे “वेनी इमॅन्युएल” या प्रारंभीच्या गायनधाटणीच्या चालीवर गायिले जाते. हे स्तोत्र इमॅन्युएलच्या आगमनासाठी केलेली उत्कट विनवणी आहे,  जे यशयापासून सुरू होते आणि बाळ येशूच्या स्वरूपाविषयी आणि उद्देशाविषयी असलेल्या अनेक संदर्भांमधून पुढे जाते.

“कम्फर्ट, कम्फर्ट यी माय पीपल”

हे जेनेव्हन स्तोत्रांचे भजन पुस्तकातले (साल्टर) गीत संगीतकार लुई बुर्ज्वा यांनी रचलेल्या “थर्स्टिंग” या चालीवर गायले जाते आणि यशया 40:1–2 वर आधारलेले आहे. जोहान्स ओलेरियस यांची ही सतराव्या शतकातील शब्दरचना वचनाच्या भविष्यसूचक सामर्थ्याविषयी, तसेच तारणहार पाठविण्यामागील देवाच्या उद्देशाविषयी ख्रिस्ती बोध देते. 

“ओ लिटल टाऊन ऑफ बेथलहेम”

हे एल. एच. रेडनर यांच्या “सेंट लुईस” या चालीवर गायले जाते. एकोणिसाव्या शतकातील ही चाल मीखा 5:2 मधील भविष्यवाणीची स्पष्ट पूर्तता दाखविते. फिलिप्स ब्रुक्स यांची 1868 मधील ही शब्दरचना लूकने नोंदविलेल्या येशूच्या जन्माच्या वृत्तांताचे परिभाषारूपाने वर्णन करते आणि चौथ्या कडव्यात सुवार्तेची स्पष्ट प्रार्थना आहे:

ओ बेथलहेमच्या पवित्र बाळा,

आम्ही प्रार्थना करतो, खाली ये;

आमचे पाप काढून टाक, आणि आत ये;

आज आमच्यामध्ये जन्म घे.

आम्ही ख्रिसमसच्या देवदूतांना ऐकतो

मोठी आनंददायक बातमी सांगताना;

ओ आमच्याकडे ये, आमच्यासोबत राहा,

आमचे प्रभू इमॅन्युएल.

“दाऊ हू वॉस्ट रिच”

हे चार्ल्स एच. किटसन यांनी तयार केलेल्या फ्रेंच कॅरल ‘क्वॅले एस्ट सेट ओड्यूर ॲग्रिएबल’ या चालीवर आणि फ्रँक हॉटन यांनी लिहिलेल्या शब्दांवर गायले जाते:

तू जो सर्व वैभवाच्या पलीकडे श्रीमंत होतास,

सर्व प्रेमापोटी तू गरीब झालास;

तू त्याग त्यांचा करून तू गोठ्यात आलास,

नीलमणी जडलेल्या दरबारापेक्षा गोठ्याची जमीन स्वीकारली.

तू जो सर्व स्तुतीपलीकडे देव आहेस,

सर्व प्रेमापोटी तू मानव झालास;

इतके खाली वाकून, पण पाप्यांना वर उचललेस,

स्वर्गाच्या दिशेने तुझ्या शाश्वत योजनेद्वारे.

तू जो सांगण्यापलीकडे प्रेम आहेस,

तारणहार आणि राजा, आम्ही तुझी उपासना करतो.

इमॅन्युएल, आमच्यामध्ये वस्ती करणारा,

आम्हाला ते बनव जे तू इच्छितोस.

आपण ख्रिसमसची गीते का गातो? नक्कीच, ती आनंद देतात, येशूचा जन्म व त्याचे जीवन यांचे स्मरण करण्यास ते साहाय्य करतात आणि आध्यात्मिकरीत्या आपली जडणघडण करतात. ख्रिसमसच्या निमित्ताने, परिचित स्तोत्रे आणि कॅरल्स यांद्वारे आपण निर्मिती, गौरव, देहधारण आणि प्रायश्चित्त यांसारख्या सिद्धांतांचा उच्चार करतो. या प्रक्रियेत ख्रिस्ताची सुवार्ता दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळते.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

टेरी यॉन्ट

टेरी यॉन्ट

डॉ. टेरी यॉन्ट हे सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील सेंट अँड्र्यूज कन्झर्व्हेटरी ऑफ म्युझिकमधील अध्यापकवर्गातील (फॅकल्टी) सदस्य आहेत आणि ते फ्रीलान्स परफॉर्मर, लेखक आणि वक्ते आहेत. त्यांनी यापूर्वी सेंट अँड्र्यूज चॅपलमध्ये ऑर्गनवादक आणि मुख्य संगीतकार म्हणून काम केले आहे.