Does God Accept the Worship of All Religions?

देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो काय?

28/05/2026
What Promise Did Jesus Give Before His Ascension

येशूने आपल्या स्वर्गारोहणापूर्वी कोणते अभिवचन दिले?

04/06/2026
Does God Accept the Worship of All Religions?

देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो काय?

28/05/2026
What Promise Did Jesus Give Before His Ascension

येशूने आपल्या स्वर्गारोहणापूर्वी कोणते अभिवचन दिले?

04/06/2026

ख्रिस्ती जीवनासाठी एक संकल्प

A Resolution for the Christian Life

आज आपण प्रेषित पौलाच्या एका पत्रातील, नवीन वर्षासाठी उपयुक्त असा एक शास्त्रभाग पाहणार आहोत. तो तुम्हाला बहुधा परिचित असेल, कदाचित तो तुम्हाला पाठही असेल. पण तो ठाऊक नसला, तरीही मला वाटते, तुम्ही तो सहज लक्षात ठेवू शकाल. फिलिप्पैकरांस पत्र 3:10-14 मधील पौलाचा हा वैयक्तिक संकल्प आहे:

हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.

फिलिप्पैकरांस पत्राच्या आरंभी पौल असे सूचित करतो की त्याचा तरुण सहकारी तीमथ्य त्याच्यासोबत होता. पौल अनेकदा आपली पत्रे सांगून लिहून घेत असे; म्हणून कधी कधी मला असे वाटते की या पत्रासाठी तीमथ्यानेच सचिवाची भूमिका बजावली असावी, म्हणून पौलाने त्याचा उल्लेख केला असावा. पत्राची सुरुवात “पौल आणि तीमथ्य” या शब्दांनी होते, आणि जेव्हा पौलाने आपल्या विश्वासातील पुत्राला स्वतःचे नाव लिहायला सांगितले असेल, तेव्हा त्याच्याकडे पाहून त्याने आपल्या मुखावर हलकेच स्मित आणले असेल का, याविषयीचे कुतूहल माझ्या मनात उत्पन्न होते. 

पण जर तसे झाले असेल तर मला याचीही खातरी आहे की पौल जेव्हा “हेच एक माझे काम,” या शब्दांवर आला, तेव्हा तीमथ्याने गोंधळलेल्या, प्रश्नार्थक नजरेने पौलाकडे पाहिले असेल. आणि पौलाने विचारले असेल की मी असे काही बोललो का जे तुला समजलेच नाही, तर कदाचित तीमथ्याने उत्तर देण्याचे धैर्य दाखवले असते : “पौला, हेच एक तुझे काम, असे मी खरोखर लिहावे, अशी तुझी इच्छा आहे का? मी तुला ओळखतो त्या दिवसापासून तू नेहमी अनेक गोष्टी करीत आला आहेस, त्याही एकाच वेळी करत आला आहेस. तू तर सर्वोत्तम ‘मल्टीटास्किंग’ म्हणजे अनेक कामे एकत्र साधणारा प्रेषित आहेस. तू नेहमी प्रवासात असतोस, नेहमी उपदेश करीत असतोस, नेहमी प्रार्थना करीत असतोस, नेहमी भेटीगाठी करीत असतोस, नेहमी समुपदेशन करीत असतोस. मी तुला कधीच केवळ एकच गोष्ट करताना पाहिलेले नाही.”   

मला वाटते, पौलाने आपला तरुण मित्र, तीमथ्याकडे पाहून स्मितहास्य केले असेल आणि म्हटले असेल: “तीमथ्या, तुला काय म्हणायचे आहे ते मला समजले. मी काय करतो, आणि मी किती व्यस्त असतो, हे तुझ्याइतके कोणाला ठाऊक असणार. पण तुला हे समजून घ्यायला हवे की मी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यात व्यस्त नाही. मी एकच गोष्ट अनेक वेगवेगळ्या रीतींनी करीत व्यस्त आहे. आणि त्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक चांगल्या प्रकारे ओळखणे, त्याच्या जीवनात सहभागी होणे, आणि त्याच्यासारखे बनत जाणे, यांशी संबंधित आहेत. मी जागा असतो त्या प्रत्येक तासात, आणि प्रत्येक निरनिराळ्या कृतीत, मी जे करतो त्यामागचा मुख्य हेतू हाच आहे; काही अर्थाने हेच त्याचे गुपित आहे. त्या सर्व गोष्टी या एकाच गोष्टीला साध्य करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत.”

मी लहानपणी स्कॉटलंडमध्ये होतो तेव्हा, प्रत्येक नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (ज्याला हॉगमने म्हणतात), माझे आई-वडील मला माझ्या खोलीत जाऊन येणाऱ्या नव्या वर्षासाठी दहा संकल्प लिहायला सांगत. मागे वळून पाहताना, मला आता हसू येते, कारण मला सुधारणा करावी लागेल असे दहा मार्ग शोधणे किती कठीण वाटायचे, ते आठवते. आज मी ते बहुधा अधिक सहज लिहू शकलो असतो, असे मला वाटते.

परंतु जर तुम्ही ख्रिस्ती असाल, तर तुम्हाला प्रत्यक्षात नववर्षासाठी फक्त एकाच संकल्पाची गरज आहे, आणि पौलाचा संकल्प तुम्हाला मोठी मदत करील. विशेषतः तुम्ही तरुण ख्रिस्ती असाल, किंवा वयानेही तरुण असाल, तर तुमचे जीवन सुलभ आणि एकात्मिक करण्याचा हाच मार्ग आहे हे समजून घेण्यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकणार नाही. हाच मार्ग तुम्हाला दिशा देईल. “मी खरेतर इथे कशासाठी आहे?” या मोठ्या प्रश्नाला उत्तर देण्यास हाच मार्ग तुम्हाला साहाय्य करील.

जसे की एका जुन्या भाषांतरात असे म्हटले आहे,

ख्रिस्ताला आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. (फिलिप्पैकरांस पत्र 3:10-14)

किती महान असा हा नवीन वर्षाचा संकल्प. हेच एक माझे काम: मला ख्रिस्ताला ओळखायचे आहे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

सिंक्लेअर बी. फर्ग्युसन

सिंक्लेअर बी. फर्ग्युसन

डॉ. सिंक्लेअर बी. फर्ग्युसन हे लिगोनिअर मिनिस्ट्रीजचे अध्यापन सहकारी, लिगोनिअर मिनिस्ट्रीजचे उपाध्यक्ष, आणि रिफॉर्मड थिओलॉजिकल सेमिनरी येथे सिस्टेमॅटिक थिओलॉजीचे चान्सलर प्रोफेसर आहेत. सोजर्नर्स अँड एक्झाइल्स यांसह लिगोनिअरच्या अनेक अध्यापन-मालिकांमध्ये ते प्रमुख शिक्षक म्हणून सहभागी आहेत. द होल क्राईस्ट, मॅच्युरिटी, आणि डिव्होटेड टू गॉड्स चर्च यांसह अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. डॉ. फर्ग्युसन हे थिंग्स अनसीन या पॉडकास्टचे यजमान आहेत.