5 Things You Should Know about Hell

नरकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

02/12/2025
3 Things You Should Know about 2 Peter

पेत्राचे दुसरे पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

11/12/2025
5 Things You Should Know about Hell

नरकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

02/12/2025
3 Things You Should Know about 2 Peter

पेत्राचे दुसरे पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

11/12/2025

कलस्सैकरांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा ३ गोष्टी

3 Things You Should Know about Colossians

आपल्याला एखादा ई-मेल किंवा संदेश समजून घ्यायचा असेल, तर त्याची पार्श्वभूमी, संदर्भ आणि उद्देश जाणून घेणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे, प्रेषित पौलाने कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्राचे योग्य आकलनही त्याची पार्श्वभूमी, संदर्भ आणि उद्देश समजल्याशिवाय होऊ शकत नाही.

पौलाने कलस्सैकरांना लिहिलेले हे पत्र एका गंभीर चिंतेतून जन्माला आले होते, की खोट्या शिकवणींमुळे कलस्सैतील विश्वासणाऱ्यांचा विश्वास आणि आचरण हळूहळू दुर्बल होत चालले होते. या खोट्या शिक्षकांना गूढ ज्ञानवादी (Gnostics) — म्हणजेच “गूढ गोष्टींचे ज्ञानी” किंवा “सर्वकाही जाणणारे” — असे म्हटले जाई, कारण त्यांचा असा दावा होता की तारणाचा मार्ग एखाद्या विशेष, गूढ ज्ञानात दडलेला आहे; असे ज्ञान जे आत्मिक श्रेष्ठांना भौतिक जगातून उचलून थेट दैवी जगात नेते.

म्हणूनच यात आश्चर्य नाही, की कलस्सैकरांस पत्रातील तीन प्रमुख विषय हे त्या गूढ ज्ञानवाद्यांच्या तीन मूलभूत शिकवणींशी थेट संबंधित आहेत.

1. ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे.

ज्ञानवाद्यांनी असे शिकवले की दैवी आत्मिक जीवांचा एक गुंतागुंतीचा पदानुक्रम आहे, आणि त्या आत्मिक श्रेणीतील सर्वात खालच्या सत्तेने भौतिक जग निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या मते कोणतीही भौतिक वस्तू किंवा देहधारी वास्तविकता ही तुच्छ आणि कमी मोलाची होती.

पौलाने मात्र ख्रिस्त हा देवाचे परिपूर्ण प्रतिरूप आहे आणि सर्व सृष्टीवर त्याचा प्रथमाधिकार आहे, हे सत्य अधोरेखित करून त्याचे सर्वांवरील सर्वोच्चत्व आणि अधिकार दृढपणे प्रस्थापित केला, कारण भौतिक तसेच आत्मिक असे सर्व काही त्याच्याच द्वारे निर्माण झाले आहे (कलस्सैकरांस 1:15–16).

त्याने जग निर्माण करून तो त्यापासून दूर झाला नाही, तर तो संपूर्ण सृष्टीला आपल्या सामर्थ्याने स्थिर ठेवतो, तिचे पोषण करतो आणि तिच्या प्रत्येक हालचालीची व्यवस्था सांभाळतो. (कलस्सैकरांस 1:17). तसेच, मंडळीवरही त्याचे सर्वोच्चत्व आणि अधिकाराचे आद्य स्थान आहे, कारण आपल्या देहधारणेमध्ये त्याने दैवी पूर्णत्वाला देहाच्या संपूर्ण मानवतेशी एकत्र केले आणि मग पापाने पीडित लोकांचा देवाशी समेट करण्यासाठी त्याच देहात दुःख सोसले, मरण पावला व पुन्हा उठला (कलस्सैकरांस 1:18–20).

पौल कलस्सैकरांना म्हणतो, “ज्ञानवाद्यांचे ऐकू नका. ख्रिस्त हाच सर्वोच्च देव आहे— अन्य कोणताही आत्मिक-जीव खरा देव नाही. भौतिक जग सर्वात खालच्या आत्मिक-जीवाने नाही, तर या सर्वोच्च ख्रिस्तानेच निर्माण केले. याच सर्वोच्च ख्रिस्ताने भौतिक देहात या भौतिक जगात प्रवेश केला. या सर्वोच्च ख्रिस्ताने हे सर्व भौतिक जगाचा देवाशी समेट घडवण्यासाठी  केले.  भौतिक जगाचे देवासाठी किती मोल आहे हे तुम्हाला उमजते का? देहाचा किंवा भौतिक जगाचा तिरस्कार करू नका; उलट, ते देवाच्या सृष्टीचे रूप म्हणून त्याचा सन्मान करा, कारण देव त्याचे तारण करू इच्छितो.” 

2. ख्रिस्त पुरेसा आहे.

गूढ ज्ञानवाद्यांनी शिकवले की तारण हे एका विशेष गुप्त ज्ञानाने (ज्याला ज्ञोसिस म्हणतात) प्राप्त होते, जे फक्त निवडक व्यक्तींनाच दुर्मिळ अंतर्दृष्टी आणि गूढ अनुभवांद्वारे मिळवता येते (कलस्सैकरांस 2:1–3). त्यांचा असा विश्वास होता की मनुष्य स्वतःला स्वतःच्या प्रयत्नांनी तारू शकतो. 

म्हणून पौलाने कलस्सैकरांचे लक्ष केवळ ख्रिस्तावरील विश्वासाकडे वळविले, कारण तोच समृद्ध आणि तारणदायी ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे. त्याने त्यांना इशारा दिला की कोणतीही अशी शिकवण स्वीकारू नका जी ख्रिस्ताच्या पर्याप्ततेपासून तुम्हाला कोणत्याही जागतिक तत्त्वज्ञान, परंपरा किंवा प्रथेकडे वळवते (कलस्सैकरांस 2:4–9). ख्रिस्तामध्येच पूर्णत्व आहे, आणि म्हणून ख्रिस्ती लोकही त्याच्यामध्ये पूर्णत्व पावले आहेत (कलस्सैकरांस 2:10). तारण किंवा पवित्रीकरणासाठी क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाशिवाय दुसरे काहीही आवश्यक नाही (कलस्सैकरांस 2:11–15). कोणतेही अतिरिक्त ज्ञान, आचरण, अनुभव किंवा देवदूत ख्रिस्तामध्ये काहीही जोडू शकत नाही. तो परिपूर्ण आहे, आणि आपण त्याच्यामध्ये परिपूर्ण आहोत (कलस्सैकरांस 2:16–23).

पौलाचे कलस्सैकरांना सांगणे असे होते: जर तुमच्याजवळ ख्रिस्त आहे, तर तुमच्याजवळ सर्व काही आहे. तुम्ही त्याच्यात काहीही जोडण्याचा प्रयत्न केलात, तर ते केवळ त्याच्याकडून तुम्हाला दूर नेईल. परिपूर्ण ख्रिस्तामध्ये परिपूर्ण विश्रांती घ्या.” 

3. ख्रिस्तच आपली ओळख आहे.

गूढ ज्ञानवाद्यांनी भौतिक जगाचा तिरस्कार केल्यामुळे, त्यांनी या जगातील नीतिआचरणांचा देखील तिरस्कार केला. त्यांच्या मते तारण म्हणजे या भौतिक जगातून सुटका मिळवून आत्मिक जगात प्रवेश करणे होय. या भौतिक जगात केलेल्या आपल्या कृती त्यांच्यासाठी काहीही अर्थपूर्ण नव्हत्या.

परंतु या  विरोधात, पौलाने शिकवले की ख्रिस्ती लोक ख्रिस्ताबरोबर पुरले गेले आहेत आणि ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहेत; म्हणूनच या जगात त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली आहे (कलस्सैकरांस 3:1–4). या नव्या ओळखीसोबत एक नवी जीवनशैली येते—या जगाकडे आणि या जगातील आपल्या जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन उदयास येतो. सांसारिक मार्गांची जुनी ओळख बाजूला सारली पाहिजे, आणि ख्रिस्तातील नवी ओळख धारण केली पाहिजे (3:5–17). ही नवी ओळख अधोरेखित करणाऱ्या सर्वसामान्य रूपरेषा नंतर पौलाने पत्नी, पती, मुले, नोकर आणि मालक यांना दिलेल्या विशिष्ट सूचनांद्वारे स्पष्ट केल्या आहेत (कलस्सैकरांस 3:18–4:6).

पौलाचे कलस्सै येथील ख्रिस्ती लोकांना केलेले आवाहन खालीलप्रमाणे सारगर्भित केले जाऊ शकते: “ज्ञानवाद्यांच्या आत्मिक जगावरील एकांगी भरामुळे भरकटून जाऊ नका. भौतिक जगावर ख्रिस्ताचे सर्वोच्चत्व याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या भौतिक शरीरांमध्ये या भौतिक जगात त्याच्या प्रभुत्वाखाली जगले पाहिजे. आणि ख्रिस्ताचा पुरेसेपणा याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एक परिपूर्ण आणि समाधानकारक नवी ओळख प्राप्त केली आहे, जी या जगातील तुमच्या संबंधांमध्ये आणि वागण्यात प्रगट झाली पाहिजे.”मग आपण ख्रिस्ताच्या सर्वोच्च प्रभुत्वाखाली कसे जगावे, परिपूर्ण ख्रिस्तामध्ये परिपूर्णता कशी शोधावी, आणि ख्रिस्तामधील आपली नवी ओळख ख्रिस्तासाठी नव्या जीवनशैलीतून कशी प्रकट करावी? पौलाच्या कलस्सैकरांना लिहिलेल्या पहिल्या आणि शेवटच्या शब्दांकडे पाहा: “तुमच्याबरोबर कृपा असो” (कलस्सैकरांस 1:2; 4:18).

हा लेख “तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी” या संग्रहाचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डॉ. डेव्हिड पी. मरे

डॉ. डेव्हिड पी. मरे

डॉ. डेव्हिड पी. मरे हे एक पाळक आणि प्राध्यापक आहेत. त्यांनी “प्रत्येक पानावर येशू” (Jesus on Every Page) आणि “ख्रिस्ती लोकांनाही नैराश्य येते” (Christians Get Depressed Too) यांसारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते “द स्टोरीचेंजर” (The StoryChanger) या पॉडकास्टचे सूत्रसंचालक देखील आहेत.