अढळ वचनबद्धता
लिगोनियर मिनिस्ट्रीज ही ख्रिस्ती विश्वासाच्या प्राचीन मतांगीकाराचे पालन करते—प्रेषितांचा मतांगीकार, नायसिन मतांगीकार आणि चाल्सेडॉनचा मतांगीकार. हे धर्मसुधारणेच्या पाच सोलांमध्ये व्यक्त झालेल्या ऐतिहासिक ख्रिस्ती विश्वासाची पुष्टी करतात. तसेच वेस्टमिन्स्टर स्टॅण्डर्ड , थ्री फॉर्म्स ऑफ युनिटी, आणि 1689 लंडन बॅप्टिस्ट मतांगीकार या ऐतिहासिक धर्म-सुधारित कबुलीजबाबांचे एकमताने समर्थन करते.
1. ऐतिहासिक ख्रिस्ती विश्वासाविषयी सातत्यपूर्ण आणि धैर्यशील वचनबद्धता टिकवणे
बदलत्या काळातही आम्ही बदलणार नाही. त्याऐवजी, आम्ही बायबलाच्या अधिकारातून आणि ख्रिस्ताच्या क्रूसाच्या पुरेपूरतेतून सामर्थ्य घेऊ. ऐतिहासिक ख्रिस्ती विश्वासाच्या शिकवणीतील वैभवापासून प्रेरणा घेऊन आम्ही शक्य तितक्या अधिक लोकांना त्यांच्या कुटुंबांत, चर्चमध्ये, व्यवसायांत, समाजांत आणि राष्ट्रांत भरभराटीने जगायला मदत करू. आमचे उद्दिष्ट हे आहे की ख्रिस्ती लोकांनी ठाम विश्वासाने जगावे आणि धर्मनिरपेक्षता, खोटे धर्मशास्त्रं, आणि आक्रमक नास्तिकता यांच्याविरुद्ध उभे राहावे.
आम्ही सर्व प्रकारच्या दुःखांबद्दल संवेदनशील आहोत—विशेषतः सार्वकालिक दुःखांबद्दल. आणि प्रभु येशूच्या महान आज्ञेतील शिष्य घडवण्याच्या प्रेरणेनेच आमची प्रत्येक सेवा प्रेरित आहे.
2. थिओलॉजी, थिओलॉजी, थिओलॉजी या गोष्टीवर भर देणे
आपण लोकांना देऊ शकतो ती सर्वात प्रेमळ गोष्ट म्हणजे सत्य. डॉ. आर. सी. स्प्रौल म्हणतात की, योग्य जीवन जगण्यापूर्वी योग्य विचार असणे आवश्यक आहे. आपण देवाबद्दल काय विचार करतो, यावर आपली ओळख ठरते—ते विचार आपल्या मूलगामी विश्वासाला भेदते आणि आपली मूल्यं, ध्येयं व निर्णय ठरवते. थिओलॉजी म्हणजे देव कोण आहे हे ओळखणे, जेणेकरून आपण त्याची उपासना करू शकू आणि त्याच्यात आनंद मानू शकू. देवाच्या कृपेने, आम्ही प्रत्येक कुळ , भाषा व राष्ट्राच्या कल्याणासाठी विश्वासू आणि फलदायी जीवन जगण्यास दिशा देणाऱ्या या सत्याविषयी आमची अढळ वचनबद्धता टिकवून ठेवू.
3. ऑडिओ आणि व्हिडिओमध्ये गुंतवणूक करणे
आम्ही व्हिडिओ-आधारित ख्रिस्ती शिक्षणात नेहमीच अग्रणी राहिलो आहोत. आज आपण आमची स्टुडिओ क्षमता वाढवत आहोत, अधिक कुशल व्यावसायिकांचे स्वागत करत आहोत आणि आमच्या ख्रिस्ती शिक्षणाच्या ग्रंथालयाचा विस्तार करत आहोत, जेणेकरून चुकांनी भरलेल्या सध्याच्या मार्केटमध्ये विश्वासार्ह शिक्षण सातत्याने पुरवता येईल. त्याच वेळी, आम्ही ऑडिओ सामग्रीच्या वितरणात झालेल्या अलीकडील विकासाचा लाभ घेण्यासाठी नवीन पॉडकास्ट्स आणि रेडिओ प्रसारणांमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत.
4. ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी साहित्य प्रकाशित करणे
संपूर्ण जगभर बायबलसाक्षरतेची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. आमचे शिष्यत्व निर्माण करणारे साहित्य देवाच्या वचनाची सत्यता एका पिढीकडून पुढील पिढीकडे पोहोचवते. आमचे स्टडी बायबल, मासिक पवित्र शास्त्र अभ्यास पत्रिका, विश्वसनीय लेखकांची पुस्तके, ऑनलाइन लेखसंग्रह आणि इतर अनेक साधने ही देव कोण आहे आणि तो आपल्या जीवनाकडे कसे पाहतो याचे भान येण्याच्या प्रक्रियेत असलेल्यांसाठी सुरुवातीची महत्त्वाची साधने ठरतात.
5. समुदायातील ख्रिस्ती लोकांना एकत्र आणणे
जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना त्यांच्या पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने आणि शक्तीने देवावर प्रीती करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. कोणीही एकटेपणात आध्यात्मिकदृष्ट्या वाढण्यासाठी रचलेला नाही, म्हणूनच आम्ही ऑर्लँडो येथील आमच्या बायबल कॉलेजमध्ये वैयक्तिक परिषदा, अंतरंग प्रशिक्षण कार्यक्रम, आणि सखोल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विश्वासूंना एकत्र करतो. आम्ही जेव्हा समुदायात वाढतो, तेव्हाच देवावर योग्यरित्या प्रेम करता येते आणि त्याची सेवा अधिक प्रभावीपणे करता येते.
6. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे
पौलाने आपल्या पत्रांचा प्रसार करण्यासाठी रोमी रस्त्यांचा उपयोग केला, मार्टिन ल्यूथरने गुटेनबर्गच्या छपाई क्रांतीचा फायदा घेतला, आणि डॉ. स्प्रौल यांनी समजूतदारपणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अंतर कमी करता येते आणि भाषेतील अडथळे दूर करता येतात, हे ओळखले. आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे; त्यामुळे आपण आपल्या सेवाकार्याचा विस्तार करण्यासाठी इंटरनेटचा नाविन्यपूर्ण वापर सुरूच ठेवू.
7. स्थानिक गरजांनुसार समायोजन व उत्तरदायित्व
कारण जगभरात देवाच्या सत्याची दुष्काळसदृश टंचाई आहे, लिगोनियर ही केवळ इंग्रजीमधील सेवा नाही. आम्ही जगभरातील ख्रिस्ती लोकांच्या विशिष्ट गरजा समजून घेतो आणि त्यानुसार शिष्यत्वाचे शिक्षण विविध भाषा आणि देशांमध्ये पोहोचवतो, जेणेकरून कुटुंबे, मंडळ्या, आणि शाळा ख्रिस्तामध्ये वाढू शकतील.
8. विश्वासार्ह जागतिक भागीदार शोधणे
कोणतीही सेवा स्वतंत्रपणे सर्वकाही करू शकत नाही. आम्ही विविध ठिकाणांतील समान विचारसरणी असलेल्या मंडळींच्या पुढाऱ्यांबद्दल, मिशनऱ्यांबद्दल आणि संस्थांबद्दल संशोधन करतो, जे विविध लोकसमूहांची सेवा करतात. आम्हाला माहीत आहे की आपण कोण आहोत, आणि आमच्या दूरदर्शी देणगीदारांमुळे आम्ही विश्वासू शिष्यत्व साहित्य जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम आहोत.
9. पाळकवर्ग व पुढाऱ्यांना सुसज्ज करणे
देवाचे वचन शिकवणाऱ्या सेवकांची बुद्धी तीक्ष्ण होण्यात आम्ही मदत करत आहोत. या सेवकांना धोरणात्मक विश्रांती आणि आत्मिक प्रोत्साहन प्राप्तीची संधी आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी खास प्रचार-सेमिनार, परिषदांचे आयोजन करतो आणि त्यांच्यासाठीच तयार केलेल्या आत्मिक वाढीच्या संधी देखील उपलब्ध करून देतो.
10. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे
डॉ. स्प्रौल यांनी आमच्या सेवाकार्याच्या केंद्रस्थानी एक गोष्ट दृढपणे निश्चित केली – “जास्तीत जास्त लोकांपर्यंत” देवाच्या पवित्रतेचा संदेश व त्याच्या वचनाचे सत्य पोहोचवणे. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही महाविद्यालये आणि शाळांतील विद्यार्थ्यांशी सक्रियपणे संवाद साधतो—त्यांचा विश्वास काय, त्यांच्या विश्वासामागील कारण काय, त्यानुसार जीवनाचारण आणि तो विश्वास इतरांपर्यंत कसा पोहोचवावा हे शिकवतो. हे आम्ही मंडळ्यांमध्ये, शाळा व महाविद्यालयांत, आमच्या कॅम्पसवर, अॅप्सद्वारे व इंटरनेटच्या माध्यमातून करतो. कल्पनांचा महान संवाद आता सत्य व असत्य यांच्यातील महान संघर्ष बनला आहे, आणि त्यामध्ये अनंतकाळचे भविष्य धोक्यात आले आहे. भविष्यात ठाम विश्वास बाळगणाऱ्या ख्रिस्ती लोकांचाच विजय होईल. आमचा हेतू असा आहे की या तरुणांच्या आत्म्यांसाठीच्या लढ्यात त्यांना मदतीचा हात द्यायचा.
लिगोनियरच्या सेवाकार्याचा जीवन-श्वास म्हणजे देवाच्या पवित्रतेची संपूर्णतेने घोषणा करणे, शिक्षण देणे व त्याचे संरक्षण करणे. प्रार्थनेसह विचार करा की प्रभु आपल्याला या सेवाकार्यासाठी कसे वापरू इच्छितो, जेणेकरून जगभरात आपल्या पवित्र देवाबद्दल आणि त्याच्या पवित्र वचनाबद्दल जागृती निर्माण होईल. आजच दिलेल्या तुमच्या भेटीमुळे हे सेवाकार्य पुढे जाईल. धन्यवाद.