
आपण आपल्या “बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग” कसा करावा?
14/08/2026
येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?
01/09/2026येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?
“कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे.” (1 पेत्र 2:21)
एका अर्थाने या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. येशू हा आमच्यासाठी कित्ता आहे का? होय. येशू आमच्यासाठी कित्ता, म्हणजेच आदर्श आहे; परंतु तो केवळ आमच्यासाठी आदर्श नाही, आणि त्याचे अनुकरण करणे हा आमच्या विश्वासाचा पाया नाही.
ख्रिस्ताचे अद्वितीय मुक्तीचे कार्य
येशूने आम्हांसाठी “एक नमुना घालून दिला की, तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवावे,” असे लिहिण्यापूर्वी पेत्र प्रथम असे सांगतो की, “ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सोसले.” याचा अर्थ असा की, ख्रिस्ताने आपल्यासाठी ज्या प्रकारे दुःख सोसले, त्या प्रकारे आपण इतरांसाठी दुःख सोसत नाही. येशूने वधस्तंभावर दुःख सोसले तेव्हा त्याने “त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली ”; आणि स्वतः जखमी होऊन त्याने आपल्या जखमा भरून काढल्या (1 पेत्र 2:24). आपण मेंढरांप्रमाणे भरकटलो होतो, परंतु त्याने आम्हांसाठी केलेल्या अद्वितीय कार्याने आम्हाला आमच्या पापापासून मुक्त केले, यासाठी की आम्हीं पवित्रतेचे जीवन जगावे (1 पेत्र 2:25).
त्याचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान, यांत येशूने, विश्वासाने त्याच्याशी एकरूप झालेल्या आम्हांसाठी, ते केले आहे जे आपण स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठीही करू शकत नाही. आपण आपल्यासारख्या पापी लोकांना त्यांच्या पापांच्या सार्वकालिक परिणामांपासून मुक्त करण्यासाठी मरू शकत नाही. परंतु येशूने, स्वतः देव आणि परिपूर्ण मनुष्य या नात्याने, वधस्तंभावर पाप्यांच्या जागी स्वतःला अर्पण केले. ख्रिस्ताने त्याच्यावर विश्वास ठेवणारे जे आपण त्या आपल्यासाठी दुःख सोसले.
चारही शुभवर्तमानांचा कळस हाच आहे की येशूने आपल्यासाठी ते केले, जे आपण स्वतःसाठी करू शकत नाही. शुभवर्तमानांचा पहिला आणि मुख्य उद्देश येशू जे करतो त्याचे अनुकरण करणे हा नसून, योहानाने अगदी स्पष्टपणे लिहिल्याप्रमाणे, येशूवर विश्वास ठेवणे हा आहे: “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. ” (योहान 20:31).
ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने त्याचे अनुकरण करणे
अहाहा! येशूच्या पावलांवर पाऊल ठेवण्याविषयी शुभवर्तमाने किती समृद्ध आहेत! त्याने साध्य केलेल्या कार्याचा गाभा अनुकरणाच्या पलीकडचा आहे; तरी त्याचे मानवी जीवन, त्याचे शब्द आणि त्याची कृत्ये अनुकरणीयरित्या अद्भुत उदाहरणांनी परिपूर्ण आहेत. आपल्याप्रमाणेच तो खरोखर मनुष्य आहे; मानवी देहधारणेत जगत असताना, पाप्यांचा विरोध आणि या पतित जगाचा मार्ग यांना सामोरे जाऊन तो आपल्या पित्याचे गौरव करीत होता. येशू हा आपल्या पापांसाठी अद्वितीय प्रायश्चित्त आहे आणि ख्रिस्ती जीवनासाठी सर्वांसमोर ठेवलेला कित्ता देखील आहे.
येशूने स्वतः आपल्या अनुयायांना त्याच्याकडून शिकण्यास आणि त्याच्या पावलांवर चालण्यास पाचारण केले. तो मत्तय 11:29 मध्ये म्हणतो, “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’ .” खरे पाहता, येशूचा “शिष्य” होणे म्हणजे हेच, कारण शिष्य म्हणजे शिकणारा. त्याचे शिष्य ते आहेत, जे त्याच्या जीवनातून व शिकवणुकीतून शिकतात आणि त्याने लावून दिलेल्या आदर्शाचे अनुकरण करतात. म्हणून, मरणाच्या आदल्या रात्री येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले, तेव्हा तो म्हणाला: “म्हणून मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे.” (योहान 13:14–15).”
ख्रिस्ताचे जीवन आणि मृत्यू यांत असलेल्या मुक्तिदायी योग्यतेची पुनरावृत्ती आपण करू शकत नाही; परंतु त्याने कंबरेला टॉवेल बांधून शिष्यांची सेवा करताना, किंवा वधस्तंभावर आपले देहार्पण करताना प्रकट केलेल्या नम्र, आत्मत्यागी प्रीतीचे अनुकरण आपण करू शकतो, आणि खरे तर करणारच आहोत.
प्रेषितही आपल्याला येशूला आपला आदर्श मानण्यास प्रोत्साहन देतात. पौल म्हणतो,
“अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले;
येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पै 2:5–8).
त्याचप्रमाणे, योहान आपल्या पहिल्या पत्रात लिहितो, “जो कोणी म्हणतो की तो [येशूमध्ये] राहतो, त्याने ज्या मार्गाने चालले, त्याच मार्गाने चालले पाहिजे,” म्हणजेच आत्मार्पित, देवाचे गौरव करणाऱ्या प्रीतीच्या मार्गाने (1 योहान 2:6).
आपल्यामध्ये वास करणाऱ्या ख्रिस्ताच्या आत्म्याचे सामर्थ्य
तर ख्रिस्ती म्हणून “सुभक्तीचे जीवन” जगण्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? पौलाने 1 तीमथ्य 3:16 मध्ये हे विशेष स्मरणीय शब्दांत व्यक्त केले आहे: “सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; , असे आपण कबूल करतो.” होय, सुभक्ती. यात काय समाविष्ट असू शकते? सद्गुणांची किंवा धार्मिक कृत्यांची एखादी संक्षिप्त सूची येईल, अशी आपण अपेक्षा करतो. परंतु त्याऐवजी पौल सुभक्तीपूर्ण ख्रिस्ती जीवनात देवमनुष्याच्या आदर्शाचे असलेले केंद्रस्थान पुढे मांडतो. तेथे आपल्याला येशूविषयीचे एक स्तोत्र दिसते:
तो देहाने प्रकट झाला,
आत्म्याने नीतिमान ठरला,
देवदूतांच्या दृष्टीस पडला,
त्याची राष्ट्रांत घोषणा झाली,
तो गौरवात वर घेतला गेला.
तुम्हाला सुभक्ती म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे आहे का? येशूकडे पाहा. तोच देहधारी “सुभक्ती” आहे. म्हणूनच ख्रिस्ती लोक सुभक्तीपूर्ण भावना आणि कृतींना अनेकदा “ख्रिस्तसदृशता” असे म्हणतात. आपल्या विश्वासाच्या केंद्रस्थानी त्याचे अद्वितीय मुक्तिदायी कार्य आहे; आणि ख्रिस्ती जीवनाचा सर्वोच्च आदर्श म्हणजे त्याचे अद्भुत रीतीने अनुकरण करता येणारे मानवी जीवन आहे.
आपण शुभवर्तमाने वाचतो आणि येशूच्या जीवनातील प्रत्येक कृतीकडे आवाक होऊन पाहतो. पाप्यांसाठी त्याने सिद्ध केलेल्या अद्वितीय कार्याविषयी आपण थक्क होतो; आणि तो लोकांशी कसा वागत होता, कशी प्रार्थना करीत होता, कसा उपदेश करीत होता, कशी करुणा दाखवीत होता, विश्रांतीसाठी कसा एकांतात जात होता आणि पुन्हा कृपेची सेवा करण्यासाठी कसा परत येत होता, हे आपण पाहतो. त्याचे प्रेम, त्याचा संयम आणि त्याचे शहाणपण यांचे आपण निरीक्षण करतो; आणि आपल्यामध्ये वास करणाऱ्या त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने, त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


