प्रार्थनेचे स्थान
27/09/2025
प्रार्थनेचे स्थान
27/09/2025

पापक्षालन आणि कोपशमन यांचा नेमका अर्थ काय आहे?

जेव्हा आपण ख्रिस्ताच्या अर्पणातील प्रतिस्थापक (परभोगी[1]) पैलूविषयी बोलतो, तेव्हा दोन शास्त्रीय शब्द वारंवार समोर येतात—पापक्षालन (इंग्रजी-expiation) आणि कोपशमन (इंग्रजी- propitiation). या शब्दांच्या संदर्भात ग्रीक मूळ शब्दाचे भाषांतर कसे करावे यावर अनेक वाद झाले आहेत. पवित्र शास्त्राच्या काही आवृत्त्या यातील पहिला शब्द वापरतात, तर काही दुसरा[2]. लोक मला अनेकदा विचारतात की या दोन शब्दांत नेमका फरक काय आहे. अडचण अशी आहे की, हे शब्द पवित्र शास्त्रात असले तरी आपण ते दैनंदिन भाषेत वापरत नाही, त्यामुळे शास्त्रात ते कोणता नेमका आशय व्यक्त करतात हे आपल्याला लगेच कळत नाही. या शब्दांच्या संदर्भासाठी आपल्याकडे नैसर्गिक उदाहरणे कमी आहेत.  

पापक्षालन आणि कोपशमन

तर मग या दोन शब्दांवर विचार करतांना, सर्वप्रथम आपण “पापक्षालन” या शब्दापासून सुरुवात करूया. वर कंसात उल्लेख केल्याप्रमाणे इंग्रजी शब्द expiation मधील Ex हा उपसर्ग “बाहेर” किंवा “पासून” असा अर्थ दर्शवतो. त्यामुळे पापक्षालन या शब्दाचा अर्थ पाहता, त्याचा आशय काहीतरी काढून टाकणे किंवा दूर करणे, असा होतो. पवित्र शास्त्राच्या संदर्भात, याचा अर्थ असा की पापाची शिक्षा भरून देऊन किंवा प्रायश्चित्त-बलिदान अर्पण करून अपराध दूर करणे. याउलट, “कोपशमन” हे त्या पापक्षालनाचा प्रापक-विषय कोण आहे त्याकडे निर्देश करते. म्हणजे, वर कंसात उल्लेख केल्याप्रमाणे, इंग्रजी शब्द propitiation यातील Pro हा उपसर्ग “साठी” किंवा “च्या बाजूने” असा अर्थ दर्शवतो. त्यामुळे कोपशमन म्हणजे देवाचा आपल्यावर असलेला कोप पालटून टाकणे—पूर्वी देवाचे जे शत्रुत्व आपल्याप्रती होते त्याची दिशा बदलून आता देव आपल्याप्रती अनुकूल झाला आहे. कोपशमन झाल्यामुळे देवाशी आपला समेट झाला असून आपल्यावर त्याचा प्रसाद झाला आहे.

एका अर्थाने, कोपशमन म्हणजे देवाचा कोप शांत करणे. “कोप शांत करणे” हा शब्द आपण सैनिकी किंवा राजकीय संदर्भातही ऐकतो—आपण तुष्टीकरणाच्या राजकारणाचा विचार करतो—ती अशी विचारसरणी आहे की जर एखादा आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी जागतिक विजेता तलवार खणखणवत युद्धाची धमकी देत असेल, तर त्याच्या रौद्रतेला आव्हान देण्याऐवजी त्याला झेकोस्लोव्हाकियातील सुडेटेनलँडसारखा काही भूभाग देऊन शांतता राखण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या आक्रमकाचा कोप शांत करण्यासाठी त्याला काहीतरी देऊन तात्पुरता दिलासा मिळवला जातो—जेणेकरून तो तुमच्या देशावर चाल करून येऊन तुम्हाला चिरडणार नाही. हे तुष्टीकरणाचे अधार्मिक आणि स्वार्थी रूप आहे. पण जर तुम्ही रागावलेले असाल, किंवा तुमच्यावर अन्याय झाला असेल, आणि मी तुमचा कोप शांत करून पुन्हा तुमच्याशी समेट साधला, तर माझ्यावर पुन्हा  तुमची कृपादृष्टी होऊन, वैमनस्याचा प्रश्न सुटतो.

ग्रीक भाषेतील एकाच शब्दाचे काही वेळा भाषांतर “पापक्षालन” असे तर काही वेळा “कोपशमन” असे केले गेले आहे. परंतु यात एक सूक्ष्म फरक आहे—पापक्षालन म्हणजे ख्रिस्ताने क्रूसावर केलेली ती कृती जी देवाची आपल्याबद्दलची वृत्ती बदलते, आणि त्या पापक्षालनाच्या फलस्वरूप होणारे कोपशमन म्हणजे देवाचा कोप शांत होणे. हा फरक अगदी खंडणी भरणे आणि खंडणी स्वीकारणाऱ्याची वृत्ती बदलणे यामधील फरकासारखा आहे.

ख्रिस्ताचे कार्य — कोप शांत करण्याची कृती

पापक्षालन आणि कोपशमन मिळून कोप शांत करण्याची कृती घडते. ख्रिस्ताने क्रूसावर देवाचा कोप शांत करण्यासाठी हे कार्य केले. पण देवाचा कोप शांत करण्याची ही संकल्पना आधुनिक धर्मशास्त्रज्ञांच्या क्रोधाला अजिबात शांत करू शकली नाही—उलट ते या विचारावरच प्रचंड रागावतात! त्यांना असे वाटते की देवाला शांत करणे, त्याला प्रसन्न करणे ही गरज त्याच्या गौरवाला कमी करते. आपण देवाच्या कोपाचा अर्थ समजून घेताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा, देवाचा कोप शांत करण्याची संकल्पना ही धर्मशास्त्रातील एखादा गौण किंवा अप्रासंगिक मुद्दा नसून, तारणाच्या मुळ गाभ्याशी निगडित आहे.

तारण म्हणजे काय?

मला एक अगदी सोपा प्रश्न विचारू द्या: “तारण” या शब्दाचा अर्थ काय आहे? याचे पटकन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास डोके गरगरू लागेल, कारण पवित्र शास्त्रात “तारण” हा शब्द सुमारे सत्तर वेगवेगळ्या संदर्भांत वापरला आहे. एखाद्याला युद्धात नक्की होणाऱ्या पराभवापासून वाचवले गेले, तर त्याने तारण अनुभवले. एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली, तर तिने तारण अनुभवले. एखाद्याची कोमेजलेली पिके पुन्हा भरभराटीस आली, तर ती पिके “वाचली.” ही पवित्र शास्त्रातील भाषा आहे आणि ती आपल्या भाषेपेक्षा फारशी वेगळी नाही. आपण पैसे “वाचवतो.” एखादा मुष्टियोद्धा घंटेमुळे वाचतो—म्हणजे त्याचा नॉकआउट होऊन सामना हरायचा टळतो, याचा अर्थ तो देवाच्या शाश्वत राज्यात गेला असा नव्हे. थोडक्यात, स्पष्ट आणि तातडीच्या धोक्यातून सुटण्याचा कोणताही अनुभव “तारण” या स्वरूपात व्यक्त होऊ शकतो.

आपण पवित्र शास्त्रानुसार तारणाविषयी बोलतो तेव्हा, शेवटी आपण नेमके कोणत्या गोष्टीपासून वाचविले जातो हे स्पष्ट करणे आवश्यक असते. प्रेषित पौल 1 थेस्सलनीकाकरांस 1:10 मध्ये हे अगदी स्पष्ट करतो—येशू “आपल्याला येणाऱ्या क्रोधापासून वाचवितो.” शेवटी, येशूने देवाच्या क्रोधापासून आपल्याला वाचवण्यासाठी प्राण दिला. येशू नासरीच्या शिकवणी आणि प्रचाराला याशिवाय आपण समजूच शकत नाही, कारण तो सतत लोकांना चेतावणी देत होता की, एक दिवस या संपूर्ण जगावर देवाचा न्याय येईल. न्यायाविषयी त्याचे काही सावधगिरीचे इशारे असे आहेत —“मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल” (मत्तय 5:22); “मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.” (मत्तय 12:36); “निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” (मत्तय 12:41).आपण पवित्र शास्त्रानुसार तारणाविषयी बोलतो तेव्हा, शेवटी आपण नेमके कोणत्या गोष्टीपासून वाचविले जातो हे स्पष्ट करणे आवश्यक असते. प्रेषित पौल 1 थेस्सलनीकाकरांस 1:10 मध्ये हे अगदी स्पष्ट करतो—येशू “आपल्याला येणाऱ्या क्रोधापासून वाचवितो.” शेवटी, येशूने देवाच्या क्रोधापासून आपल्याला वाचवण्यासाठी प्राण दिला. येशू नासरीच्या शिकवणी आणि प्रचाराला याशिवाय आपण समजूच शकत नाही, कारण तो सतत लोकांना चेतावणी देत होता की, एक दिवस या संपूर्ण जगावर देवाचा न्याय येईल. न्यायाविषयी त्याचे काही सावधगिरीचे इशारे असे आहेत —“मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल” (मत्तय 5:22); “मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.” (मत्तय 12:36); “निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” (मत्तय 12:41). येशूचे देवशास्त्रीय तत्वज्ञान हे संकटाचे देवशास्त्र होते. “संकट” या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे—“न्याय.” आणि ज्या संकटाबद्दल येशू प्रचार करत होता ते म्हणजे जगावर येऊन ठेपलेल्या न्यायाचे संकट, जेव्हा देव अपवित्र, देवहीन आणि पश्चात्ताप न केलेल्यांवर आपला क्रोध ओतणार आहे. त्या क्रोधाच्या वर्षावापासून वाचण्याची एकमेव आशा म्हणजे ख्रिस्ताच्या पापक्षालनाने आच्छादित होणे.

आपण पवित्र शास्त्रानुसार तारणाविषयी बोलतो तेव्हा, शेवटी आपण नेमके कोणत्या गोष्टीपासून वाचविले जातो हे स्पष्ट करणे आवश्यक असते. प्रेषित पौल 1 थेस्सलनीकाकरांस 1:10 मध्ये हे अगदी स्पष्ट करतो—येशू “आपल्याला येणाऱ्या क्रोधापासून वाचवितो.” शेवटी, येशूने देवाच्या क्रोधापासून आपल्याला वाचवण्यासाठी प्राण दिला. येशू नासरीच्या शिकवणी आणि प्रचाराला याशिवाय आपण समजूच शकत नाही, कारण तो सतत लोकांना चेतावणी देत होता की, एक दिवस या संपूर्ण जगावर देवाचा न्याय येईल. न्यायाविषयी त्याचे काही सावधगिरीचे इशारे असे आहेत —“मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल” (मत्तय 5:22); “मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. (मत्तय 12:36); “निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. (मत्तय 12:41). येशूचे देवशास्त्रीय तत्वज्ञान हे संकटाचे देवशास्त्र होते. “संकट” या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे—“न्याय.” आणि ज्या संकटाबद्दल येशू प्रचार करत होता ते म्हणजे जगावर येऊन ठेपलेल्या न्यायाचे संकट, जेव्हा देव अपवित्र, देवहीन आणि पश्चात्ताप न केलेल्यांवर आपला क्रोध ओतणार आहे. त्या क्रोधाच्या वर्षावापासून वाचण्याची एकमेव आशा म्हणजे ख्रिस्ताच्या पापक्षालनाने आच्छादित होणे.

म्हणूनच, क्रूसावरील ख्रिस्ताची सर्वोच्च कार्यसिद्धी म्हणजे ही की त्याने देवाचा कोप शांत केला. आपण जर ख्रिस्ताच्या बलिदानाने आच्छादित नसतो, तर तो कोप आपल्या विरोधात भडकत राहिला असता. त्यामुळे जर कोणी देवाचा कोप शांत करण्याच्या संकल्पनेला—किंवा ख्रिस्ताने देवाचा कोप शमविला या विचाराला—विरोध करत असेल, तर सावध राहा, कारण येथे प्रत्यक्षांत सुवार्तेचाच प्रश्न ऐरणीवर येतो. हे सत्य तारणाच्या मूळ गाभ्याशी निगडित आहे—की पापक्षालनाने आच्छादित लोक म्हणून आपण त्या महासंकटांतून मुक्त झालो आहोत, ज्याला प्रत्येक मनुष्य सामोरा जातो. क्रोधाविष्ट झालेल्या पवित्र देवाच्या हातात सापडणे हे भयंकर आहे. पण ज्यांच्या पापांची खंडणी भरण्यात आली आहे, त्यांच्यावर आता क्रोध नाहीच. हाच तारणाचा खरा अर्थ आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


[1] देवशास्त्रीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात, याचा अर्थ असा की ख्रिस्ताने आपल्या लोकांच्या वतीने त्यांच्या अपराधांचा भार स्वतःवर घेतला आणि त्यांच्या जागी शिक्षा सोसली.

[2] वास्तविक पाहता, मराठी बायबलमध्ये ‘प्रायश्चित्त’ हा शब्द वापरलेला आहे, जो नेमका अर्थ अभिव्यक्त करत नाही. परंतु “प्रायश्चित्त” हा उपसर्गयुक्त शब्द नाही. त्यामुळे मराठी संपादकांनी ‘पापक्षालन’ आणि ‘कोपशमन’ हे शब्द वापरले आहेत.

आर. सी. स्प्रौल
आर. सी. स्प्रौल
डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.